JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / माजी महापौर रमेश प्रभू यांचं निधन

माजी महापौर रमेश प्रभू यांचं निधन

11 डिसेंबर : माजी महापौर आणि शिवसेनेचे माजी आमदार रमेश प्रभू यांचं राहत्या घरी निधन झालं.गेल्या काही दिवसांपासून ते राजकारणापासून दूर होते.राजकारणात असले तरी रमेश प्रभू यांचं समाजकार्यही मोठं होतं.त्यामुळे विलेपार्लेमध्ये त्यांची वेगळी ओळख होती. 1989ची गाजलेली निवडणूक ते जिंकले होते. पहिल्यांदाच हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणूक जिंकली होती. त्या निवडणुकीचा प्रचार वादग्रस्त ठरला होता. त्याच वादग्रस्त प्रचारामुळे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, रमेश प्रभू आणि सुभाष देसाई यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ramesh prabhu 11 डिसेंबर : माजी महापौर आणि शिवसेनेचे माजी आमदार रमेश प्रभू यांचं राहत्या घरी निधन झालं.गेल्या काही दिवसांपासून ते राजकारणापासून दूर होते.राजकारणात असले तरी रमेश प्रभू यांचं समाजकार्यही मोठं होतं.त्यामुळे विलेपार्लेमध्ये त्यांची वेगळी ओळख होती. 1989ची गाजलेली निवडणूक ते जिंकले होते. पहिल्यांदाच हिंदुत्वाच्या मुद्यावर निवडणूक जिंकली होती. त्या निवडणुकीचा प्रचार वादग्रस्त ठरला होता. त्याच वादग्रस्त प्रचारामुळे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, रमेश प्रभू आणि सुभाष देसाई यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. 2004 ला त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मनसेच्या स्थापनेनंतर ते मनसेत गेले. मनसेचे ते काही काळ उपाध्यक्ष होते तसंच त्यांनी खासदारकीचीही निवडणूक लढवली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या