JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / महिलांना चौथर्‍यावर प्रवेश नाहीच, महिला अध्यक्षांनी केला विरोध

महिलांना चौथर्‍यावर प्रवेश नाहीच, महिला अध्यक्षांनी केला विरोध

11 जानेवारी : शनिशिंगणापूर येथील शनैश्वयर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी इतिहासात प्रथमच महिलेची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मात्र, महिला अध्यक्ष झाल्यानंतरही महिलांना शनी चौथर्‍यावर प्रवेश मिळणार नाही, अशी आश्चर्यकारक भूमिका महिला अध्यक्ष अनिता शेटे यांनी घेतली आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रभरातील महिलांनी संताप व्यक्त केला असून देवस्थानच्या अध्यक्ष महिला असूनही उपयोग काय असा प्रश्न विचारला जातोय. महिला अध्यक्ष झाल्यानंतर तरी महिलांना शनी चौथर्‍यावर प्रवेश दिला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र संस्थानची परंपरा यापुढेही चालू राहणार असं आपल्या भाषणात सांगून अध्यक्षांनी महिलांना निराश केलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
anita Shete

11 जानेवारी : शनिशिंगणापूर येथील शनैश्वयर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी इतिहासात प्रथमच महिलेची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मात्र, महिला अध्यक्ष झाल्यानंतरही महिलांना शनी चौथर्‍यावर प्रवेश मिळणार नाही, अशी आश्चर्यकारक भूमिका महिला अध्यक्ष अनिता शेटे यांनी घेतली आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रभरातील महिलांनी संताप व्यक्त केला असून देवस्थानच्या अध्यक्ष महिला असूनही उपयोग काय असा प्रश्न विचारला जातोय.

महिला अध्यक्ष झाल्यानंतर तरी महिलांना शनी चौथर्‍यावर प्रवेश दिला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र संस्थानची परंपरा यापुढेही चालू राहणार असं आपल्या भाषणात सांगून अध्यक्षांनी महिलांना निराश केलं.

शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत विश्वस्त असलेल्या अनिता शेटे यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. तर, उपाध्यक्षपदी नानासाहेब बानकर यांची निवड झाली आहे. देवस्थान ट्रस्टच्या 11 विश्वनस्तांमध्ये अनिता शेटे आणि शालिनी लांडे या दोन महिलांची निवड झाली होती.

संबंधित बातम्या

शनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावर जाऊन एका तरुणीने अभिषेक केला. त्यावरून जोरदार चर्चा झाली होती. गावकर्‍यांनी या घटनेचा निषेध केला होता. तर ‘अंनिस’कडून या घटनेचे स्वागत करण्यात आले होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या