25 जानेवारी : युगांडाच्या महिलांशी गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेले आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे कायदामंत्री सोमनाथ भारती अगोदरच अडचणीत सापडले आहे. आता भारती यांनी पुन्हा आपल्या पायावर कुर्हाड मारुन घेतली आहे.
आज शनिवारी सकाळी एका महिला पत्रकाराने सोमनाथ भारती यांना नैतिकता स्विकारुन आपण राजीनामा देणार का असा प्रश्न विचारला असता. भारती भडकले आणि त्या महिला पत्रकारावर बेछुट आरोप केले. माझी बदनामी करायला नरेंद्र मोदींनी किती पैसे दिले असा आरोप भारती यांनी केला. ‘आप’ने जे पोलिसांचे व्हिडिओ दाखवले आहे ते दाखवा आणि लोकांना याबाबत विचारा अशी ‘ऑर्डर’ही भारती यांनी दिली.
त्यांच्या या बडबडीमुळे आम आदमी पार्टीने नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यापासून ‘आप’नं फारकत घेतलीय. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांचं नाव घेऊन आरोप केल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.