23 जुलै : बिहारमधील गया जिल्ह्यात माओवाद्यांनी रेल्वे रूळ स्फोट करून उडवले आहेत. दिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्स्प्रेस उडविण्याची माओवाद्यांची योजना होती.
गया जिल्ह्यातील इस्माईलपूर आणि रफीगंज या स्टेशनदरम्यान माओवाद्यांनी सुमारे पाच मीटर रेल्वे रुळ स्फोटाच्या सहाय्याने उडविला. त्यामुळे येथून जाणारे पायलट इंजिन रुळावरून घसरले. मंगळवारी मध्यरात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली. यानंतर रेल्वेच्या अधिकार्यांनी सतर्क होत राजधानी एक्स्प्रेस रोखली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++