25 मे : आयपीएलच्या धर्तीवर 26 जुलैपासून प्रो कबड्डी लीगला सुरुवात होतं आहे. लहानपणापासून खेळाची प्रचंड आवड, घरची परिस्थिती बेताची पण मेहनतीच्या अपार जोरावर बारामतीच्या दादा आव्हाड या तरुणानं दिल्ली टीममध्ये स्थान पटकावलं आहे. दिल्लीच्या टीमने त्याला त्यांच्या बाजूने खळण्यासाठी विकत घेतलं आहे.
लहानपणापासून आपल्या खेळातील कौशल्याने आजपर्यंत दादा आव्हाडने अनेक स्पर्धांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आत्तापर्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करत त्याने जिल्हास्तरापासून ते राज्य स्तरापर्यंत अनेक स्पर्धांत घवघवीत यश मिळवलं आणि अखेर त्याच्या या मेहनतीचं चीज झालं आहे.
आयपीएलच्या धर्तीवर मशाल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि भारतीय कबड्डी संघटनेनं प्रो कबड्डी लीग स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत 8 टीम्स खेळणार आहेत. त्यामुळे दादा सारख्या अनेक कबड्डीपटूंचं स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++