19 जून : प्रीती झिंटा आणि नेस वाडिया प्रकरणात अंडरवर्ल्डने एंट्री केल्यामुळे वेगळंच वळण मिळालंय.
उद्योजक आणि नेस वाडियाचे वडील नसली वाडिया यांना बुधवार जो धमकीचा फोन आला होता, तो गँगस्टर रवी पुजारीनंच केला होता असं पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालंय. हा फोन इराणमधून आला होता. पुजारीने दावा केला होता की, तो ऑस्ट्रेलियातून बोलतोय पण चौकशीमधून हा फोन इराणमधून आल्याचं स्पष्ट झालंय. खबरदारी म्हणून पोलिसांनी पुजारीच्या गँगच्या सदस्यावर मुंबईमध्ये नजर ठेवून आहे.
पंजाब इलेव्हन मॅचच्या दरम्यान नेस वाडियाने स्टेडियमवर छेड काढली म्हणून प्रीतीने विनयभंगाची तक्रार दाखल केली या प्रकरणी वाडिया विरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला. तक्रार दाखल होऊन दोन दिवस उलट नाही तेच नेसचे वडील नेसली वाडिया यांनी अंडरवर्ल्डकडून धमकीचा फोन आला. प्रीतीला त्रास देऊ नका आणि नुसली वाडियांनी या प्रकरणात लक्ष देऊ नये, अशी तंबी देण्यात आली होती. नुसली वाडियांना पहिला कॉल हा ऑफिसच्या लँडलाईनवर आला होता. त्यावेळी त्यांच्याबाबत सेक्रेटरीकडे चौकशी करण्यात आली होती. पण नुसली वाडियांशी संपर्क झाला नसल्यानं दुसर्या सेक्रेटरीच्या मोबाईलवर आणखी एक कॉल आला. फोन करणार्यानं आपण रवी पुजारी असल्याचं सांगितलं होतं.ऑस्ट्रेलियातून हा फोन केल्याचा दावा त्यानं केला होता. एवढंच नाही तर त्या सेक्रेटरीला मोबाईलवर इंग्रजीत मेसेजही मिळाला. हे कॉल VOIP म्हणजेच व्हाईस ओव्हर इंटरनेस प्रोटोकॉल या यंत्रणेद्वारे करण्यात आले होते,तर जो मेसेज आला तो इराणमधल्या नंबरवरून करण्यात आला होता असं सूत्रांकडून कळतंय. अमेरिकेत स्थायिक होणार नाही -प्रीती दरम्यान, पोलिसांनी प्रीतीला जबाब नोंदवण्यासाठी मुंबईत यायला सांगितलं होतं. त्यानुसार ती आज मुंबईत येण्याची शक्यता आहे. तिने या संदर्भात एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये तिने किंग्ज इलेव्हनचे शेअर्स विकणार नसल्याचं सांगितलंय. अमेरिकेमध्ये स्थायिक होण्याचा विचार नसल्याचंही तिने स्पष्ट केलंय. प्रीती आणि नेस वाडिया प्रकरणी नेस वाडियांचे वडील नुस्ली वाडिया यांनी अंडरवर्ल्डकडून धमकी आल्याची तक्रार पोलिसात दाखल केलीय. तर मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी प्रीतीच्या वकिलांना तिला पुरवणी जबाब नोंदवायला सांगितलं. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++