JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / हातेकरांवरच्या कारवाईविरोधात विद्यार्थी आक्रमक

हातेकरांवरच्या कारवाईविरोधात विद्यार्थी आक्रमक

08 जानेवारी : जोपर्यंत डॉ. नीरज हातेकर यांच्यावरची निलंबनाची कारवाई मागे घेतली जात नाह, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दिलाय. इतकंच नाही, तर 12 जानेवारीला होणारा दीक्षांत समारंभही होऊ न देण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. डॉ. माशेलकरांनी हा कार्यक्रम रद्द करावा असं आवाहन विद्यार्थ्यांनी केलंय. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये तब्बल 4 तास गेटबंद आंदोलन करत विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला. प्राध्यापकांची मुक्ता आणि बुक्टू ही संघटना, आम आदमी पक्ष, बुद्धीवंत, विचारवंत आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी हातेकरांना पाठिंबा जाहीर केलाय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

student protest 08 जानेवारी : जोपर्यंत डॉ. नीरज हातेकर यांच्यावरची निलंबनाची कारवाई मागे घेतली जात नाह, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दिलाय. इतकंच नाही, तर 12 जानेवारीला होणारा दीक्षांत समारंभही होऊ न देण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय.

डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. डॉ. माशेलकरांनी हा कार्यक्रम रद्द करावा असं आवाहन विद्यार्थ्यांनी केलंय. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये तब्बल 4 तास गेटबंद आंदोलन करत विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला. प्राध्यापकांची मुक्ता आणि बुक्टू ही संघटना, आम आदमी पक्ष, बुद्धीवंत, विचारवंत आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी हातेकरांना पाठिंबा जाहीर केलाय. फक्त अर्थशास्त्रच नाही तर इतर तब्बल 60 विभागांचे विद्यार्थी हातेकर सरांना परत आणण्याची मागणी करत आहे. विद्यार्थ्यांनी ‘सेव्ह मुंबई युनिव्हर्सिटी’ नावाचं फेसबुक कँपेनही सुरू केलंय.

दरम्यान, पोलीस बळ वापरुन विद्यार्थ्यांना गेटवरुन हटवण्यात आलंय पण शांततामय मार्गानं आंदोलन सुरूच ठेवणार असं विद्यार्थ्यांनी सांगितलंय. दरम्यान, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरु द.ना.धनागरे यांनी मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या प्रा. ए.आर. देसाई स्मृती व्याख्यानमालेचं निमंत्रण नाकारलंय. तर, येत्या 12 जानेवारीला ज्येष्ठ संशोधक रघुनाथ माशेलकर यांच्या उपस्थितीत विद्यापीठात दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आलाय. विद्यापीठाने आयोजित केलेला कार्यक्रम माशेलकर सरांनी रद्द करावा, असं आवाहन विद्यार्थ्यांनी माशेलकर यांच्याकडे केलंय. 12 जानेवारीला विद्यार्थी आंदोलन करणार आहेत. युवा सेनेनं या बहिष्काराला पाठिंबा दिलाय. यासंदर्भातलं निषेधाचं पत्र त्यांनी कुलगुरुंना दिलंय.

संबंधित बातम्या

  निलंबनाचा वाद आता कोर्टात मुंबई विद्यापीठ विरूद्ध प्रा. हातेकर यांच्या निलंबनाचा वाद आता कोर्टात गेला आहे. आपल्या निलंबनाच्या कारवाई विरोधात डॉ. हातेकर यांनी काल मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. कुलुगुरुंनी केलेलं निलंबन रद्द करण्यात यावं, आणि निकाल लागेपर्यंत तातडीनं या निलंबनाला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. निलंबनाच्या कारवाईचे पत्र हे कुलुगुरुंच्या सहीचे आहे. कायद्यानुसार असा ठराव मॅनेजमेंट कौन्सिल मध्ये झाला पाहिजे. पण, मॅनेजमेंट कौन्सिलमध्ये असा ठराव झालेला नाही. विद्यापीठाच्या कोड ऑफ कंडक्टनुसार निलंबनाच्या पत्राचा एक मसुदा निश्चित आहे. पण हातेकरांच्या निलंबनाचे पत्र या मसुद्यात नाहीये. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे, कुलगुरुंनी त्यांच्यावर ठेवलेला ठपका चुकीचा असल्याचंही हातेकर यांनी स्पष्ट केलंय. सोशल मीडियावरही मोहीम सोशल मीडियाच्या माध्यमातून होतेकर यांच्या निलंबनाविरोधात विद्यार्थांना एकत्र येण्याचं आवाहन केलं जातंय. विद्यार्थ्यांनी ‘सेव्ह मुंबई युनिव्हर्सिटी’ या नावाने फेसबुक कँपेनही सुरू केलंय. युवा सेनेनं या बहिष्काराला पाठिंबा दिला आहे. तर इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी हातेकरांना पाठिंबा दिला आहे. “प्रा. नीरज हातेकर हे असामान्य विद्वान आहेत. मला खूप वर्षांपासून त्यांच्या कामाचे कौतुक आहे. हातेकरांना एवढा पाठिंबा मिळतोय हे बघून खूप बरं वाटतंय”, असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. डॉ. नीरज हातेकर यांच्या निलंबनानंतर आयबीएन लोकमतचे सवाल - डॉ. नीरज हातेकर यांच्यासारख्या विद्यार्थीप्रिय प्राध्यापकांना निलंबित करण्याआधी त्यांची बाजू का ऐकून घेण्यात आली नाही ? - डॉ. हातेकर यांच्या निलंबनांचा ठराव व्यवस्थापन परिषदेमध्ये मंजूर झाला नसताना, कुलगुरुंनी निलंबनाचा आदेश कसा काढला ? - हातेकरांच्या निलंबनाआधी कुलगुरुंनी कारणे दाखवा नोटीस का बजावली नाही ? - डॉ. नीरज हातेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची कुलगुरु मोकळेपणानं थेट उत्तरं का देत नाहीत - स्वत:चे विशेषाधिकार वापरण्याइतकं डॉ. नीरज हातेकर यांचं निलंबन डॉ. राजन वेळूकर यांच्यासाठी तातडीचं का होतं ? - डॉ. नीरज हातेकर यांना परत आणा, हा विद्यार्थ्यांचा आवाज कुलगुरुंना कधी ऐकू येणार ? - हातेकरांच्या निलंबन काळात, विद्यार्थ्यांच्या होणार्‍या शैक्षणिक नुकसानाला कोण जबाबदार आहे ? - हातेकरांचं निलंबन किती काळासाठी आहे, हे अद्याप का स्पष्ट करण्यात आलं नाही ? - हातेकरांच्या निलंबन काळात त्यांच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम कोण शिकवणार ?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या