JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / हातेकर घेणार कँटीनच्या शेडमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग

हातेकर घेणार कँटीनच्या शेडमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग

13 जानेवारी : प्राध्यापक नीरज हातेकरांचे मुंबई विद्यापीठातून निलंबन करण्यात आलंय. मात्र अजूनही प्रा.हातेकर शिकवत असलेल्या विषयाला पर्यायी प्राध्यापकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हातेकरांनाच शिकवण्याची विनंती केलीय. त्याला प्रा. नीरज हातेकर तयारी दाखवली आहे. ते उद्यापासून दुपारी 3 ते 5च्या दरम्यान विद्यापीठाच्या कँटीन शेडमध्ये शिकवणी घेणार आहेत. दरम्यान, नीरज हातेकर यांना देशभरातून पाठिंबा मिळतोय. भारतातील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जगदीश भगवती यांनीही हातेकरांना पाठिंबा दिलाय. इतिहासकार रामचंद्र गुहा, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक अनिर्बन कार यांनीही याआधी हातेकरांना पाठिंबा जाहीर केलाय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

neeraj hatekar 4 13 जानेवारी : प्राध्यापक नीरज हातेकरांचे मुंबई विद्यापीठातून निलंबन करण्यात आलंय. मात्र अजूनही प्रा.हातेकर शिकवत असलेल्या विषयाला पर्यायी प्राध्यापकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हातेकरांनाच शिकवण्याची विनंती केलीय. त्याला प्रा. नीरज हातेकर तयारी दाखवली आहे. ते उद्यापासून दुपारी 3 ते 5च्या दरम्यान विद्यापीठाच्या कँटीन शेडमध्ये शिकवणी घेणार आहेत.

दरम्यान, नीरज हातेकर यांना देशभरातून पाठिंबा मिळतोय. भारतातील ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ जगदीश भगवती यांनीही हातेकरांना पाठिंबा दिलाय. इतिहासकार रामचंद्र गुहा, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक अनिर्बन कार यांनीही याआधी हातेकरांना पाठिंबा जाहीर केलाय. इतकंच नाही तर कोलंबिया आणि बोस्टन विद्यापीठासह देशातल्या महत्त्वाच्या विद्यापीठांमधले नामवंत प्राध्यापकही हातेकरांच्या पाठीशी आहेत. हातेकरांना पाठिंबा देणारे अर्थशास्त्रज्ञ आता थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून हातेकरांचं निलंबन मागे घेण्याची विनंती करणार आहेत. प्राध्यापक हातेकर यांना कुणी-कुणी पाठिंबा दिलाय ?

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या