JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / प्राण यांचा जीवन प्रवास

प्राण यांचा जीवन प्रवास

12 जुलै: ते स्टार व्हिलन .. देखणे.. त्यांच्यामुळे त्यांचे हिरोही उठून दिसायचे.. प्राण.. म्हणजेच प्राण क्रिश्न सिकंद.. लाहोरमध्ये 2 फेब्रुवारी 1920ला जन्म.. लाहोरमध्येच पंचोली स्टुडिओत प्राण यांचं करिअर सुरू झालं ते कॅमेरा डिपार्टमेंटमध्ये.. बॉलिवूडच्या या व्हिलननं नंतर कधी मागे वळून पाहिलंच नाही. त्यांची पहिली भूमिकाही खलनायकाचीच होती. 1940 मध्ये दलसुख पंचोली यांच्या पंजाबी सिनेमा ‘यमला जाट’मध्ये ते खलनायक होते. त्यानंतर दोन वर्षांनी आलेल्या खानदान सिनेमात प्राण नायक होते. आणि फाळणीपर्यंत त्यांना नायकाच्याच भूमिका मिळत होत्या.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

12 जुलै:  ते स्टार व्हिलन .. देखणे.. त्यांच्यामुळे त्यांचे हिरोही उठून दिसायचे.. प्राण.. म्हणजेच प्राण क्रिश्न सिकंद.. लाहोरमध्ये 2 फेब्रुवारी 1920ला जन्म.. लाहोरमध्येच पंचोली स्टुडिओत प्राण यांचं करिअर सुरू झालं ते कॅमेरा डिपार्टमेंटमध्ये.. बॉलिवूडच्या या व्हिलननं नंतर कधी मागे वळून पाहिलंच नाही. त्यांची पहिली भूमिकाही खलनायकाचीच होती. 1940 मध्ये दलसुख पंचोली यांच्या पंजाबी सिनेमा ‘यमला जाट’मध्ये ते खलनायक होते. त्यानंतर दोन वर्षांनी आलेल्या खानदान सिनेमात प्राण नायक होते. आणि फाळणीपर्यंत त्यांना नायकाच्याच भूमिका मिळत होत्या.

संबंधित बातम्या

फाळणीनंतर मुंबईला आलेल्या प्राण यांना थोडा संघर्ष करावा लागला. पण लेखक सादत हसन मांटो यांच्या मदतीनं त्यांना जिद्दीमध्ये भूमिका मिळाली. जिद्दीचे हिरो होते देव आनंद.. आणि हा सिनेमा प्राण यांच्या करियरमधला टर्निंग पाँइंट बनला. प्राण यांनी देव आनंद, राज कपूर आणि दिलीप कुमार यांच्यासोबत जास्तीत जास्त काम केलंय. औरत, बडी बहेन, जिस देस मे गंगा बहती है, हाल्फ टिकिट, पुरब और पश्चिम, डॉन, अमर अकबर अँथनी, जंजीर… प्राण यांच्या या सिनेमांतल्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या. उपकार, आँसू बन गये फूल आणि बेईमान सिनेमांसाठी प्राण यांना सहाय्यक अभिनेता म्हणून फिल्म फेअर ऍवॉर्ड मिळालं.. 1997मध्ये फिल्म फेअरचा जीवनगौरव पुरस्कारही मिळाला…2001मध्ये पद्मभूषणनं त्यांचा गौरव केला गेला.. तर 2010मध्ये दादासाहेब फाळके ऍकॅडमीतर्फे त्यांना सन्मानित केलं गेलं. भारतीय सिनेमांमध्ये खलनायक म्हणून अजरामर झालेले प्राण यांचा अभिनय कधीच एकसुरी झाला नाही. त्यांनी काही विनोदी भूमिकाही केल्या.. 1997मध्ये अमिताभ बच्चनच्या मृत्यूदाता सिनेमात त्यांनी शेवटची भूमिका केली. 350पेक्षा जास्त सिनेमे करणारे प्राण प्रेक्षकांसाठी कायमचे आवडते खलनायक होते..त्यांना आयबीएन-लोकमतची आदरांजली… प्राण यांचे गाजलेले चित्रपट

प्राण यांचा पुरस्कारांनी गौरव - 2013 - दादासाहेब फाळके पुरस्कार - 2001 - पद्मभूषण - 1997 - फिल्म फेअर जीवनगौरव पुरस्कार - 1967, 1969, 1972 - फिल्म फेअर पुरस्कार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या