JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / पानसरे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नागोरीसह 50 जणांची चौकशी

पानसरे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी नागोरीसह 50 जणांची चौकशी

17 फेब्रुवारी : कॉ. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्या हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. या प्रकरणी 50 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यामध्ये पिस्तूल तस्कर मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांचाही समावेश आहे. पोलीस 50 जणांची कसून चौकशी करत आहे. तसंच मुंबई आणि पुण्याचं एटीएसचे पथकंही पहाटे कोल्हापूरमध्ये दाखल झालं आहे. काल सोमवारी सकाळी मॉर्निग वॉकवरून येत असताना गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
äÖÖê»ÖêÖêßÖ ÖêææÖê

17 फेब्रुवारी : कॉ. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्या हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. या प्रकरणी 50 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यामध्ये पिस्तूल तस्कर मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांचाही समावेश आहे. पोलीस 50 जणांची कसून चौकशी करत आहे. तसंच मुंबई आणि पुण्याचं एटीएसचे पथकंही पहाटे कोल्हापूरमध्ये दाखल झालं आहे.

काल सोमवारी सकाळी मॉर्निग वॉकवरून येत असताना गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तातडीने पोलिसांची 10 पथक तैनात करण्यात आली. तसंच राज्यभरात नाकाबंदी करण्यात आलीये. पोलिसांनी प्राथमिक तपासणी म्हणून संध्याकाळी 5 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आणखी 50 जणांना ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे कुख्यात नागोरी गँगच्या मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणीही दोघांना ताब्यात घेतलं होतं पण चौकशीत काही निष्पन्न होऊ न शकल्यामुळे त्यांची जामिनावर सुटका झाली.

संबंधित बातम्या

पानसरे यांच्यावर ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने तपासामध्ये अडथळे येत आहे. पण गोळीबार झाल्यानंतर पोलिसांच्या तपासातून हल्ल्यासाठी गावठी कठ्याचा वापर झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. रुग्णालयासमोरही स्ट्रायकिंग फोर्स तैनात करण्यात आली आहे. पण 24 तास उटलूनही अद्याप पानसरेंच्या हल्लेखोरांची माहिती मिळालेली नाहीये. दरम्यान या हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये सर्वसमावेशक मोर्चाचं आयोजन केलं असून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

जाहिरात

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या