JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / पाटणा स्फोट :NIAच्या तावडीतून संशयित पळाला

पाटणा स्फोट :NIAच्या तावडीतून संशयित पळाला

31 ऑक्टोबर : बिहारची राजधानी पाटणा साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातला महत्त्वाचा संशयित मेहरे आलम याने बिहार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढलाय. मेहरे आलम बिहार पोलिसांच्या ताब्यात होता. त्याला दोन दिवसांपूर्वी दरभंगातून अटक करण्यात आली होती. बुधवारी रात्री मुझफ्फरनगर रेल्वे स्टेशनजवळ एका लॉजवर थांबले होते. त्यावेळी त्याने बाथरूममध्ये जाण्याच्या बहाण्यानं आलमने पळ काढलाय. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार एनआयएची टीम आलमची चौकशी करत होती त्याची कस्टडी ही बिहार पोलिसांकडे होती. पाटणा स्फोटात मुख्य संशियत इम्तियाजला ताब्यात घेण्यात आलं होतं त्याच्या चौकशीतून त्याने मेहरे आलमच नाव घेतलं होतं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

patna blast 31 ऑक्टोबर : बिहारची राजधानी पाटणा साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातला महत्त्वाचा संशयित मेहरे आलम याने बिहार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढलाय. मेहरे आलम बिहार पोलिसांच्या ताब्यात होता.

त्याला दोन दिवसांपूर्वी दरभंगातून अटक करण्यात आली होती. बुधवारी रात्री मुझफ्फरनगर रेल्वे स्टेशनजवळ एका लॉजवर थांबले होते. त्यावेळी त्याने बाथरूममध्ये जाण्याच्या बहाण्यानं आलमने पळ काढलाय. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार एनआयएची टीम आलमची चौकशी करत होती त्याची कस्टडी ही बिहार पोलिसांकडे होती.

पाटणा स्फोटात मुख्य संशियत इम्तियाजला ताब्यात घेण्यात आलं होतं त्याच्या चौकशीतून त्याने मेहरे आलमच नाव घेतलं होतं. या माहितीवरुन आलमला ताब्यात घेण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या