11 सप्टेंबर : सीमारेषेवर पाक सैनिकांनी केलेल्या घुसखोरीमुळे भारत आणि पाकिस्तानातील संबंध ताणले गेलेत. याचा फटका आता चॅम्पियन्स लीग टी 20 ला बसणार आहे. 17 सप्टेंबरपासून सुरू होणार्या चॅम्पियन्स लीगमध्ये पाकिस्तानची फैझलाबाद वूल्व्हस ही टीम खेळणार होती. पण पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मिळणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. सुरक्षेच्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सरकारमधील सूत्रांकडून कळतंय. जर पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा मिळाला नाही तर इतर 3 टीम्समधून क्वालिफायर्स खेळवल्या जातील असं बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितलंय.