31 मार्च : टोल प्रश्नावर काही दिवसांपूर्वी अनेक आंदोलने झाली. सरकारने त्यानंतर अनेक आश्वासनेही दिली. यात सर्व सामान्यांना दिलासा मिळेल अशी आशा होती. पण राज्य सरकारने नविन वर्षाच्या सुरूवातीलाचं एक चांगलाचं धक्का दिला आहे. तुम्ही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून जाणार असाल तर आता तुम्हाला जास्त टोल द्यावा लागेल. सध्या कार आणि छोट्या वाहनांना 165 रूपये द्यावे लागतात. पण आता त्यात 30 रुपयांनी वाढ होणार आहे. मिनीबसच्या टोलमध्ये 45 रूपयांनी वाढ झाली आहे आणि बसला आता 87 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत.
करारानुसार दर तीन वर्षांनी टोलचे दर वाढवण्याचे अधिकार कंपनीला देण्यात आल्याचं रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्यांनी सांगितलं आहे. 2017 पर्यंत ही दरवाढ लागू राहणार आहे. दरम्यान, काही दिवसांन पूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वता: रस्त्यावर उतरून टोल विरोधात जोरदार आंदोलन केलं होतं. आज संध्याकाळी पुण्यात राज ठाकरे आपल्या प्रचारसभेचा नारळ फोडणार आहेत. त्यामुळे या दरवाढीबद्दल ते काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्षं लागलं आहे. एक्स्प्रेस वे च्या टोलमध्ये वाढ वाहन जुने दर नवे दर