JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / नंदुरबार : हिंदु सातपुडा मेळाव्यात संघाचं जोरदार शक्तीप्रदर्शन

नंदुरबार : हिंदु सातपुडा मेळाव्यात संघाचं जोरदार शक्तीप्रदर्शन

प्रशांत बाग, नंदूरबार 14 जानेवारी : नंदूरबारमध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं हिंदू सातपुडा मेळावा आयोजित केला होता. सुरुवातीला विरोध करणार्‍या अनेक आदिवासी संघटनांनीही या मेळाव्याला नंतर आवर्जून हजेरी लावली. भव्य व्यासपीठ, लक्ष वेधून घेणारी राम मंदिराची प्रतिकृती आणि रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा केलेले आदिवासी… आदिवासी बहुल भागात पहिल्यांदा होणार्‍या संघाच्या मेळाव्यातलं हे चित्र होतं. हिंदू कोड बिल मानत नाही असं म्हणत या मेळाव्याला काही आदिवासी संघटनांनी जोरदार विरोधही केला होता. पण तरीही नंदुरबारमध्ये हा हिंदू मेळावा झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

प्रशांत बाग, नंदूरबार

 14 जानेवारी : नंदूरबारमध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं हिंदू सातपुडा मेळावा आयोजित केला होता. सुरुवातीला विरोध करणार्‍या अनेक आदिवासी संघटनांनीही या मेळाव्याला नंतर आवर्जून हजेरी लावली. dasl;hdjahsy भव्य व्यासपीठ, लक्ष वेधून घेणारी राम मंदिराची प्रतिकृती आणि रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा केलेले आदिवासी… आदिवासी बहुल भागात पहिल्यांदा होणार्‍या संघाच्या मेळाव्यातलं हे चित्र होतं. हिंदू कोड बिल मानत नाही असं म्हणत या मेळाव्याला काही आदिवासी संघटनांनी जोरदार विरोधही केला होता. पण तरीही नंदुरबारमध्ये हा हिंदू मेळावा झाला. या मेळाव्यात सरसंघचालकांनी आदिवासींच्या धर्मांतरावर भर दिला. 100 टक्के आदिवासी भागात पहिल्यांदा घेतलेल्या या मेळाव्यात संघाची हिंदू राष्ट्राबाबतची आग्रही भूमिका प्रामुख्याने दिसून आली. हा मेळावा म्हणजे संघाचं शक्तिप्रदर्शन होतं, हे तर स्पष्टच होतं. या मेळाव्याला आदिवासींनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यांची संख्या लक्षणीय तर होतीच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरसंघचालकांनी आळवलेला हिंदू राष्ट्राचा राग आणि धर्मांतर झालेल्यांच्या घरवापसीची भूमिका. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या