17 सप्टेंबर : राजधानी दिल्ली सत्तेचं मुख्य केंद्र..त्यामुळे दिल्लीत सत्ता कुणाची असेल यावरुन अंदाज बांधले जात आहे. या वर्षाअखेर दिल्ली विधानसभेची निवडणूक होतेय. या निवडणुकीचा निवडणूक पूर्व सर्व्हे द हिंदुस्थान टाइम्स आणि सी फोर यांनी संयुक्तपणे केलाय. या सर्व्हेनुसार दिल्लीच्या सत्तेच्या चाव्या काँग्रेसकडे कायम राहतीलं असा कौल जनतेनं दिलाय. काँग्रेसला या निवडणुकीत 32 ते 37 जागा मिळतील. तर भाजपला 22 ते 27 जागा मिळतील. तर दुसरीकडे जनआंदोलनातून उभी राहिलेली अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी ही किंगमेकर ठरेल. आम आदमीला 7 ते 12 जागा मिळतील असं सर्व्हेवरुन स्पष्ट होतंय. मतांची टक्केवारीत काँग्रेसला 34 टक्के, भाजपला 32, बसपाला 7 आणि आम आदमीला 21 टक्के मतदान होईल. हा सर्व्हे 1 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान करण्यात आलाय. प्रत्येक मतदारसंघातल्या 50 मतदान केंद्रामध्ये हा सर्व्हे करण्यात आलाय. यात एकूण 14 हजार 689 मतदारांचा सहभाग घेतला. दिल्लीची निवडणूक महत्त्वाची का? दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. दिल्लीत पुन्हा काँग्रेसची सत्ता आली तर सलग चार वेळा निवडणूक जिंकणार्या काँग्रेसच्या त्या पहिल्या मुख्यमंत्री ठरतील. पण, काँग्रेस हरली तर हा पराभव त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट असेल. तिकडे केंद्रातल्या सत्तेची स्वप्न बघणार्या भाजपसाठी दिल्लीचा विजय महत्त्वाचा असेल. शिवाय एकेकाळी दिल्ली हा भाजपचाच बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. शिवाय दिल्लीच्या निकालावरून सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांचा मूडही लक्षात येईल. ====================================================================== कौल जनतेचा - दिल्ली विधानसभा ======================================================================
====================================================================== अपेक्षित निकाल
एकूण जागा - 70 ====================================================================== कोणता पक्ष, किती सक्षम ?
पक्ष स्थिती
काँग्रेस - 34%
भाजप - 28%
आम आदमी पार्टी - 20%
बसपा/इतर-10%
माहित नाही -8%
====================================================================== 1) शीला दीक्षितांच्या कार्यकालावर तुम्ही समाधानी आहात का?
====================================================================== 2) काँग्रेस सत्तेत आल्यास, शीला दीक्षित मुख्यमंत्री व्हाव्यात ?
3) मुख्यमंत्री कोण व्हावा?
4) आम आदमी पार्टी सत्तेत आल्यास बदल होईल?
5) आम आदमी पार्टी रिंगणात नसेल, तर कुणाला मत द्याल?
6) कोणता पक्ष स्वच्छ कारभार करू शकेल ?
======================================================================