25 एप्रिल : ऑर्थर रोड जेलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल घुले यांचं निलंबन करण्यात आलं आहे. जेल प्रशासनानं डॉ. घुले यांना पदावरून बडतर्फ करावं असा अहवाल दिला होता. त्यानुसार डॉ. घुले यांना वैद्यकीय विभागातूनही निलंबित करण्यात आलं आहे. डॉ. घुलेंना कारागृह सेवेतून परत पाठवण्यात आलं आहे.
डॉ. घुले यांनी जेलमधला भ्रष्टाचार बाहेर काढणारं एक पत्र थेट मुख्यमंत्र्यांना लिहीलं होतं. त्यानंतर जेल प्रशासनानं डॉ. घुले यांच्यावर कारवाई केली होती. छगन भुजबळ यांना जेलबाहेर पडायला मदत केल्याचा आरोप डॉ. घुले यांच्यावर ठेवण्यात आला होता. पण जे.जे. हॉस्पीटलचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीनं भुजबळ यांना हॉस्पिटलमध्ये हलवणं गरजेचं असल्याचा अहवाल दिला होता. पण हा अहवाल जेल प्रशासनानं जोडलाच नाही. त्यामुळे जेलमधला गैरकारभार बाहेर आणल्याचं प्रकरण डॉ. घुले यांना भोवल्याचं बोललं जातं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv