28 जुलै : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम…विख्यात अणुशास्त्रज्ञ, स्वदेशी बनावटीच्या भारतीय क्षेपणास्त्रांचे शिल्पकार, अंतराळाचा वेध घेणारे शास्त्रज्ञ, कवी, तत्वज्ञ, भारतरत्न आणि एक सह्रदयी माणूस…कलाम यांच्या निधनामुळे अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केलंय. टिवटरवरून मान्यवरांनी कलाम यांना श्रद्धांजली वाहिली.
- राहुल गांधी “अब्दुल कलामांच्या निधनाचं वृत्त ऐकून दुःख झालं. अनेक पैलू असणारी व्यक्ती. सर्व देशाचं मन त्यांनी त्यांच्या ज्ञानाने आणि वागणुकीने जिंकलं होतं.” - मनमोहन सिंह “संरक्षण क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण बनवणारा महान शास्त्रज्ञ आणि उत्तम माणूस आपण गमावला असल्याची प्रतिक्रीया माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी व्यक्त केली.” - शाहरुख खान “गुरुदासपूरवर झालेला हल्ला आणि आता डॉ. कलमांच्या निधनाचं वृत्त ऐकून दुःख झालं.” शंकर महादेवन “सर्वच भारतीयांसाठी हा दुःखाचा दिवस आहे. एपीजे अब्दुल कलाम यांचं निधन झालंय. सर्वांसाठीच ते प्रेरणास्थान होते.” सचिन तेंडुलकर “आज सारा देश एका महान व्यक्तिमत्त्वाला गमावल्याच्या दुःखात आहे. भारताचे माजी राष्ट्रपती, विख्यात शास्त्रज्ञ आणि सर्वांसाठीच प्रेरणा असणारं एक थोर व्यक्तिमत्त्व.. RIP डॉ. अब्दुल कलाम” संगीतकार ए.आर. रहमान “डॉ. कलाम तुम्ही राष्ट्रपती झालात, तेव्हा तुम्ही भारतीयांसाठी ‘आशा’ या शब्दाला नवीन अर्थ दिला. देशातल्या तरुणाईला प्रेरणा देणारा थोर नेता आज आम्ही गमावला आहे. आपण पृथ्वीवरच्या एका महान देशामध्ये राहत आहोत आणि आपल्या प्रत्येकाला उत्तम गोष्टी मिळवता येतील याचा विश्वास तुम्ही दिलात. तुम्हाला स्वर्गप्राप्ती होवो. "
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++