JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / ठाणे विधान परिषदेत शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांना उमेदवारी जाहीर

ठाणे विधान परिषदेत शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांना उमेदवारी जाहीर

17 मे : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे रिंगणात आहेत. त्यामुळे यंदा राष्ट्रवादीचे वसंत डावखरे विरुद्ध सेना-भाजप युतीचे रवींद्र फाटक अशी लढत रंगतदार होणार आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठीचा अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यापार्श्वभूमीवर सेनेकडून रवींद्र फाटक यांचं नाव निश्चित करण्यात आलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी काल (सोमवारी) रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
ravindra pathak thanejpg

17 मे : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे रिंगणात आहेत. त्यामुळे यंदा राष्ट्रवादीचे वसंत डावखरे विरुद्ध सेना-भाजप युतीचे रवींद्र फाटक अशी लढत रंगतदार होणार आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठीचा अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यापार्श्वभूमीवर सेनेकडून रवींद्र फाटक यांचं नाव निश्चित करण्यात आलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी काल (सोमवारी) रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर युतीचे उमेदवार म्हणून रवींद्र फाटक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. बंडखोरी टाळण्यासाठी अखेरच्या दिवशी शिवसेनेकडून नाव जाहीर करण्यात आलं. फाटक हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.

ठाणे विधानपरीषद निवडणुक

संबंधित बातम्या

पक्षीय बलाबल - युतीची ताकद शिवसेना - 311 ` भाजप - 180 एकूण - 491

पक्षीय बलाबल- आघाडीची ताकद

राष्ट्रवादी काँग्रेस - 199 काँग्रेस - 103 बहुजन विकास आघाडी - 119 एकूण - 421

पक्षीय बलाबल- इतर

अपक्ष - 48 मनसे - 20 सप - 17 आरपीआय - 8 बसप - 5 कोणार्क विकास आघाडी - 7 सेक्युलर अलायन्स ऑफ इंडिया - 4 एमआयएम - 1 सीपीएम - 5 एकुण - 119


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या