14 मार्च : पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्ब विस्फोटातील मुख्य आरोपी यासीन भटकला पुणे सेशन कोर्टाने आज (शुक्रवार) 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.
यासीन भटकलच्या सुरक्षीततेकरिता न्यालयात कडेकोठ बंदोबसत लावणमण्यात आला होता. तपासा करिता यासीन भटकलला पोलीस कोठडी देण्यात यावी अशी ममागणी पोलिसांना कडून न्यायालयात करण्यात आली. न्यायालयाने भटकलला 28 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
इंडियन मुजाहिद्दीनचा कार्यकर्ता यासिन भटकळ बंगळुरू बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड असल्याची माहितीही पुढे येतेय. पुण्यात जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड म्हणूनही यासिन भटकळचं नाव पुढे आलं होतं. यासिन हा रियाझ भटकळ याचा साथीदार आहे. मागील वर्षी यासीनला नेपाळच्या बॉर्डरवरुन अटक करण्यात आली होती.