
नागपूर - 03 फेब्रुवारी : युग चांडक अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपींना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी राजेश धनालाल दवारे आणि अरविंद अभिलाष सिंग दोषी असल्याचं नागपूरच्या जिल्हा न्यायालयात 30 जानेवारी रोजी सिद्ध झालं आहे.
युग चांडक या चिमुरड्याची हत्या करणार्या मारेकर्यांना आज फाशी होते की जन्मठेप याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. युगच्या अपहरण आणि हत्येमुळे नागपूरह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. चिमुरड्याची हत्या करणार्या आरपींवर जनतेत प्रचंड संताप आहे. आता अपहरण आणि हत्या प्रकरणात आरोपींवर दोष सिद्ध झाल्यानंतर कोर्ट कोणती शिक्षा सुनावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv