06 जानेवारी : ‘दगडू आणि प्राजक्ता’ची लव्हस्टोरी अर्थात ‘टाइमपास’ने बॉक्स ऑफिसवर धूम केलीय. शुक्रवारी रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास’ प्रदर्शित झाला आणि अवघ्या चार दिवसात ‘टाइमपास’ने बॉक्स ऑफिसवर साडेपाच कोटींचा गल्ला जमा केलाय.
केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळे शुक्रवारपासूनच चित्रपटगृहांत हाऊसफुल्लचे बोर्ड्स झळकत आहेत. केतकीने साकारलेली ‘प्राजक्ता’ची भूमिका आणि प्रथमेशने साकारलेली ‘दगडू’ची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. खास करून टप्पोरी आणि बिनधास्त दगडूने चांगलीच धम्माल उडवलीय.
ठाणे-डोंबिवली-कल्याण-पनवेल अगदी रायगडपर्यंत जे वातावरण 90च्या काळात होतं, त्याच वातावरणात फुलणारी ही लव्हस्टोरी आहे. प्राजक्ता राहतेय ती चाळ म्हणजे सुशिक्षित म्हणवणार्या उच्चवर्णीयांची आणि दगडू गरीब, रिक्षावाल्याचा मुलगा असतो. अनेक वर्ष दगडू दहावीतच अडकलाय त्यामुळे तो पेपरवाटण्याचं काम करत असतो. कॉलेजमध्ये प्राजक्ताला पाहिल्यानंतर दगडू तिच्या प्रेमात पडतो. आणि मग याची लव्हस्टोरी सुरू होती. दुनियेची कसलीच फिकीर नसलेल्या या प्रेमी जीवांचं हे प्रेम कयामत पासून कयामत पर्यंत कसं जातं, त्याचा टाइमपास प्रवास सिनेमात दिसतो. मागिल वर्षी ‘दुनियादारी’ सिनेमाने बॉक्सऑफिसवर भरघोस कमाई केली होती. आता त्याच्यापाठोपाठ ‘टाइमपास’ने तीनच दिवसात दमदार गल्ला कमवून सुरूवात केलीय.
हे पण पाहा
- फिल्म रिव्ह्यु : ज्यु.कॉलेजची टाइम’पास’ लव्हस्टोरी !
- टॉक टाइममध्ये केतकी आणि प्रथमेश - फूल टाइमपास