30 जून : चंद्रपुरच्या गोसीखुर्द शहराजवळ एक वाघ मृतावस्थेत आढळलाय. दोन वाघांच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जातेय. धक्कादायक म्हणजे, एकाच आठवडयातली ही दुसरी घटना असल्याने वनखाते हादरलंय.
गोसीखुर्दजवळ एक पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाताच चंद्रपूरचे वनसंरक्षक संजय ठाकरे आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर पोहचले. वाघाच्या शरीरावर काही जखमा आहेत.
परिस्थिती पाहता दोन वाघांच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. गेल्याच आठवड्यात ताडोबाच्या जंगलात चिमुर तालुक्यात एका वाघाचा मृतदेह आढळला होता.
या ठिकाणी शिकारीवरून दोन वाघांची झुंज झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. यामुळं वनविभागात अस्वस्थता पसरलीये.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++