14 जून : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जनतेला खूश करण्यासाठी राज्य सरकारने घोषणांचा धडका लावलाय. मुंबईनंतर आता ठाण्यातही मेट्रो प्रकल्प उभा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली आहे. घाटकोपर ते ठाणे असा 31 किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो धावणार आहे. हाच मार्ग भविष्यात भिवंडी मार्गे कल्याण असा वाढणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. घाटकोपर ते ठाणे दरम्यान एकूण 29 स्थानकं असणार आहेत तर यासाठी एकूण खर्च 22 हजार कोटी रुपये असणार आहे. मुंबई मेट्रो मागील आठवड्यात सुरू करण्यात आली. वर्सोवा ते घाटकोपर अशा 11 किलोमीटरच्या अंतरावर मेट्रो धावत आहे. तर घाटकोपर ते ठाणे असा 31 किलोमीटरची मेट्रोची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मुंबई मेट्रोसाठी तब्बल आठ वर्षांचा कालावधी लागला. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++