27 सप्टेंबर : बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष एन श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला. 29 तारखेला होणार्या बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे. ही निवडणूक एन श्रीनिवासन लढवू शकतात, पण जिंकले तरी ते अध्यक्षपदाचा पदभार स्विकारु शकत नाहीत, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय. श्रीनिवासन यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यापासून रोखावं अशी याचिका बिहार क्रिकेट बोर्डाने दाखल केली होती. यावर निकाल देताना सुप्रीम कोर्टान हा आदेश दिलाय. प्रकरणाची पूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत श्रीनिवासन यांना अध्यक्षपदाचा पदभार स्विकारता येणार नाही.