23 फेब्रुवारी : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांचा तपास काहीसा पुढे सरकला आहे. कोल्हापूर पोलिसांनी आज (सोमवारी) 2 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांचीही कसून चौकशी सुरू आहे. या दोघांना आज ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, कागलजवळ एक बेवारस दुचाकीही सापडली आहे.
मारेकर्यांनी कॉ. पानसरे यांना मारण्यासाठी 7.65 मिमीचं पिस्तुल वापरलं होतं. विशेष म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खूनही याच प्रकारच्या पिस्तुलानं करण्यात आला होता. हे पिस्तुल सहज उपलब्ध होऊ शकतं. या हल्ल्यात एकूण चौघेजण सहभागी होते आणि हल्ल्याच्या वेळी 2 मोटारसायकल वापरण्यात आल्याचंही पोलीस तपासात समोर येतं आहे. कॉ. पानसरे दाभोलकरांच्या हत्येविरोधात राज्यव्यापी आंदोलन उभारणार होते. त्यासंदर्भात त्यांना धमक्याही मिळाल्या होत्या, अशी माहितीही मिळत आहे. हल्ल्यापूर्वी पानसरे सलग तीन दिवस मॉर्निंग वॉकला गेले नव्हते. हल्ल्याच्या दिवशी ते हुतात्मा स्मारकाजवळच्या हॉटेलमध्ये नाश्ता करायला गेले होते आणि परत येत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. मोटरसाकलस्वारांनी उमा पानसरेंना पत्ताही विचारला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कोल्हापूरला गेलेलं मुंबई क्राईम ब्रँचचं पथक मुंबईल परत गेलं आहे.
दरम्यान, कागलजवळ दूधगंगा नदीजवळ एक बेवारस दुचाकी सापडली आहे. या स्पेलंडरवरही नंबरप्लेट नाही. पोलीस पुढचा तपास करत आहेत. यापूर्वीही कोल्हापूर शहरातच नंबरप्लेट नसलेली एका बाईक सापडली होती. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++