JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / कॉ.गोविंद पानसरेंच्या हत्येवर राज्यसभेत चर्चा

कॉ.गोविंद पानसरेंच्या हत्येवर राज्यसभेत चर्चा

24 फेब्रुवारी : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येवर आज (मंगळवारी) अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी राज्यसभेत चर्चा झाली. काँग्रेसचे गोव्यातील खासदार शांताराम नाईक यांनी हा मुद्दा उपस्थित केला. भाकपचे डी. राजा यांनी त्याला समर्थन दिलं. या वेळी त्यांनी पानसरेंच्या मारेकर्‍यांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली आहे. कॉ.गोविंद पानसरे यांनी आयुष्यभर टोलविरोधात लढा दिला. काही राजकीय पक्षांकडून होत असलेल्या बेकायदेशीर टोलवसुलीला त्यांचा कायम विरोध केला आसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. एक आठवड्यापूर्वी 16 फेब्रुवारी रोजी कॉ.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा
pansare in rajyasabha

24 फेब्रुवारी :  कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येवर आज (मंगळवारी) अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी राज्यसभेत चर्चा झाली. काँग्रेसचे गोव्यातील खासदार शांताराम नाईक यांनी हा मुद्दा उपस्थित केला. भाकपचे डी. राजा यांनी त्याला समर्थन दिलं. या वेळी त्यांनी पानसरेंच्या मारेकर्‍यांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली आहे. कॉ.गोविंद पानसरे यांनी आयुष्यभर टोलविरोधात लढा दिला. काही राजकीय पक्षांकडून होत असलेल्या बेकायदेशीर टोलवसुलीला त्यांचा कायम विरोध केला आसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

एक आठवड्यापूर्वी 16 फेब्रुवारी रोजी कॉ. पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर कॉ. गोविंद पानसरे यांचं उपचारादरम्यान निधन झालं. दरम्यान, आठवडा उलटूनही पानसरेंचे मारेकरी अजूनही मोकाटच असून राज्यभरातील कम्युनिस्ट कार्यकर्त्यांकडून संताप आणि निषेध व्यक्त केलाय.

संबंधित बातम्या

दरम्यान, कॉ.गोविंग पानसरे यांचा शोक प्रस्ताव विधानसभेत मांडावा अशी मागणी विरोधकांची सरकारकडे केली होती. मात्र, सरकारने हा प्रस्ताव फेटाळला आहे. सभागृहा बाहेरच्या व्यक्तिचा प्रस्ताव मांडता येणार नसल्याचं सांगत सरकारने ही विरोधकांनी ही मागणी फेटाळली आहे. ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या