26 एप्रिल : पंतप्रधान मोदींनी रविवारी ‘मन की बात’ या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हिवरे बाजाराचं कौतुक केल्यानंतर आता सगळ्या देशाचं लक्ष हिवरे बाजारकडे लागलं आहे. केंद्रीय जलसंपदा आणि नदीविकास मंत्री उमा भारती या पुढच्या आठवड्याच नगरमधल्या हिवरे बाजारला भेट देणार आहेत.
गेल्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशभरातल्या दुष्काळावर भाष्य केलं होतं. दुष्काळानं लोकांचं जगणं हैराण केलं असलं तरी महाराष्ट्रातील हिवरे बाजारमधल्या जलयुक्त कामांचं यावेळी पंतप्रधानांनी कौतुक होतं. पोपटराव पवार यांनी पाण्याचं नियोजन करून गावात बाराही महिने पाण्याची सोय कोली आहे. तसंच, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हिवरे बाजारनं आपली पीक पद्धत बदलली. सिंचनाचा वापर केला याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी हिवरे बाजारच्या समृद्धीचा दाखला दिला. त्यानंतर आता उमा भारती अख्खं मंत्रालय घेऊन हिवरे बाजारमध्ये येणार आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv