20 नोव्हेंबर : मुंबईतील वरळी भागातील अनधिकृत मजले असलेल्या कॅम्पा कोला प्रकरणी राज्य सरकार अध्यादेश काढणार नाही या भूमिकेवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ठाम आहेत. त्यांनी आपली भूमिका मंत्रिमंडळासमोर मांडली. इतर कोणता पर्याय असेल तर त्याबाबत एका आठवड्यात निर्णय घेण्यात असल्याचं गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी जाहीर केलंय. त्यामुळे कॅम्पा कोलाला राज्यसरकारडूनही दार बंद झालंय. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी 31 मेपर्यंत घरं खाली करण्याचे आदेश दिले आहे. जर घरं खाली केले नाही तर महापालिकेनं धडक कारवाई करावी असे आदेशही कोर्टाने दिले आहे. यावर अखेरचा उपाय म्हणून कॅम्पा कोलाचे रहिवासी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तोडगा काढण्याची मागणी केली होती मात्र मुख्यमंत्र्यांनी अनधिकृत इमारतीबाबत काहीच करता येणार नाही असा निर्णय देऊन राष्ट्रवादीची मागणी धुडकावून लावलीय.