JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / कलम 370 मुळे काश्मीरच्या विकासात अडथळा -गडकरी

कलम 370 मुळे काश्मीरच्या विकासात अडथळा -गडकरी

28 मे : कलम 370 मुळेच जम्मू आणि काश्मीरचा विकास रखडला असून तिथे विकासासाठी उद्योगसृष्टी उभारणं गरजेच आहे यासाठी कलम 370 रद्द झाले पाहिजे अशी ठाम भूमिका आता भाजपचे नेते आणि रस्ते, परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मांडली आहे. कलम 370 रद्द करण्यासाठी भाजपनं चर्चा सुरू केल्याचं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी स्पष्ट केल्यामुळे वाद पेटला आहे. आज जितेंद्र सिंग यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

66nitin_gadkari_art370 28 मे : कलम 370 मुळेच जम्मू आणि काश्मीरचा विकास रखडला असून तिथे विकासासाठी उद्योगसृष्टी उभारणं गरजेच आहे यासाठी कलम 370 रद्द झाले पाहिजे अशी ठाम भूमिका आता भाजपचे नेते आणि रस्ते, परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मांडली आहे. कलम 370 रद्द करण्यासाठी भाजपनं चर्चा सुरू केल्याचं पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी स्पष्ट केल्यामुळे वाद पेटला आहे. आज जितेंद्र सिंग यांनी आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. पण, आता या प्रकरणात गडकरी यांनीही यात उडी घेतली. आपण नुकताच श्रीनगर आणि लेह-लडाखचा दौरा केला आणि कलम 370 बाबत तिथल्या जनतेशी बातचीत केल्याचं गडकरी यांनी सांगितलं. कलम 370 मुळे तिथला विकास रखडला आहे. तिथे भुकबळी होते, लाखो तरुण बेरोजगार आहे त्यामुळे परदेशी गुंतवणूक होणे गरजेचं आहे. पण कलम 370 मुळे अनेक उद्योजक तिथे जमीन खरेदी करू शकत नाही. त्यामुळे हे कलम रद्द करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या जनतेची समजूत घालण्याचे आम्ही प्रयत्न करतोय. त्यात आम्हाला यश नक्की येईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे हे कलम रद्द केलं तर काश्मीर भारताचा भाग रहाणार नाही, अशी कठोर प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली. पंतप्रधान कार्यालयाच्या राज्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा विरोध करण्याचा निर्णयही नॅशनल कॉन्फरंसने घेतला आहे. तर पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री राजेंद्र सिंग यांच्या वक्तव्यामुळे लोकांमध्ये धर्माच्या आधारावर फूट पाडण्याची भीती असल्याचं पीडीपी अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलंय. संघ भाजपच्या बाजूने जम्मू आणि काश्मीर भारताचा भाग असणार नाही ? ओमरना त्यांचं राज्य त्यांची वडिलोपार्जित संपत्ती वाटते काय? असा सवाल राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने उपस्थित केलाय. तसंच 370 कलम असो वा नसो, जम्मू आणि काश्मीर नेहमीच भारताचा अविभाज्य भाग राहील असं संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी म्हटलंय. राम माधव यांनी याबद्दल ट्विटवर प्रतिक्रिया नोंदवली. जम्मू आणि काश्मीर भारताचा भाग असणार नाही ? ओमर अब्दुला यांना त्यांचं राज्य त्यांची वडिलोपार्जित संपत्ती वाटते काय? 370 असो वा नसो, जम्मू आणि काश्मीर नेहमीच भारताचा अविभाज्य भाग राहील असंही माधव म्हणाले. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या