JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 'उद्या सकाळी 8 पर्यंत कामावर रुजू व्हा',निवासी डाॅक्टरांना शेवटची संधी

'उद्या सकाळी 8 पर्यंत कामावर रुजू व्हा',निवासी डाॅक्टरांना शेवटची संधी

24 मार्च : ‘उद्या सकाळी 8 पर्यंत कामावर रुजू व्हा’ निवासी डॉक्टरांना ही शेवटची संधी असल्याचा अल्टिमेटम मुंबई हायकोर्टाने आंदोलनकर्त्या डॉक्टरांना दिलाय. डॉक्टर उद्यापर्यंत कामावर रूजू झाले नाहीत तर त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिले आहे. निवासी डॉक्टरांना सुरक्षा देण्याची हमी देण्यासोबतच ११०० सुरक्षा रक्षक राज्यभरातील रूग्णालयांमध्ये तैनात करण्याचं आश्वासन देऊनही डॉक्टरांनी कामावर रूजू व्हायला नकार दिलाय. याबाबत निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने केलेल्या आवाहनालाही डॉक्टरांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवत आपलं आंदोलन सुरूच ठेवलंय.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

doctors185915dl1198 24 मार्च : ‘उद्या सकाळी 8 पर्यंत कामावर रुजू व्हा’ निवासी डॉक्टरांना ही शेवटची संधी असल्याचा अल्टिमेटम मुंबई हायकोर्टाने आंदोलनकर्त्या डॉक्टरांना दिलाय. डॉक्टर उद्यापर्यंत कामावर रूजू झाले नाहीत तर त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिले आहे. निवासी डॉक्टरांना सुरक्षा देण्याची हमी देण्यासोबतच ११०० सुरक्षा रक्षक राज्यभरातील रूग्णालयांमध्ये तैनात करण्याचं आश्वासन देऊनही डॉक्टरांनी कामावर रूजू व्हायला नकार दिलाय. याबाबत निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने केलेल्या आवाहनालाही डॉक्टरांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवत आपलं आंदोलन सुरूच ठेवलंय. डॉक्टरांच्या या आडमुठेपणामुळे मुंबईतल्या ३ रूग्णालयांमध्ये १३५ जण दगावलेत. यात केईएममध्ये 53, सायन रूग्णालयात 48 तर नायर रूग्णालयात 34 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान, इंडियन असोसिएशनने आपला संप मागे घेतलाय. आता निवासी डाॅक्टर कामावर रुजू होता हे पाहण्याचं ठरणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या