JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / इस्त्रोने 'सार्क' उपग्रह प्रक्षेपित करावा - मोदी

इस्त्रोने 'सार्क' उपग्रह प्रक्षेपित करावा - मोदी

30 जून : प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा क्षण असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. PSLV C-23 या उपग्रहांचं प्रक्षेपण पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. इस्रोच्या शास्त्रज्ञांमुळे उपनिषदांपासून सुरू झालेलं विज्ञान उपग्रहांपर्यंत नेऊन ठेवलत अशा शब्दांत मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं. मी सुरुवातीच्या काळात सायकलवरून उपग्रह वाहून नेल्याचे फोटो पाहिले आहेत. आपण अंतराळक्षेत्रात खूपच पुढे आलो आहोत. हॉलिवूडमधल्या ‘ग्रॅव्हिटी’ चित्रपटापेक्षा कमी खर्चात भारताचे उपग्रह प्रक्षेपित होतात. हे फक्त शास्त्रज्ञांच्या कष्टामुळेच शक्य झालं आहे असंही पंतप्रधान म्हणाले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

30 जून : प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा क्षण असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. PSLV C-23 या उपग्रहांचं प्रक्षेपण पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. इस्रोच्या शास्त्रज्ञांमुळे उपनिषदांपासून सुरू झालेलं विज्ञान उपग्रहांपर्यंत नेऊन ठेवलत अशा शब्दांत मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं.

मी सुरुवातीच्या काळात सायकलवरून उपग्रह वाहून नेल्याचे फोटो पाहिले आहेत. आपण अंतराळक्षेत्रात खूपच पुढे आलो आहोत. हॉलिवूडमधल्या ‘ग्रॅव्हिटी’ चित्रपटापेक्षा कमी खर्चात भारताचे उपग्रह प्रक्षेपित होतात. हे फक्त शास्त्रज्ञांच्या कष्टामुळेच शक्य झालं आहे असंही पंतप्रधान म्हणाले. त्याचं बरोबर, देशातल्या विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानात रस घेण्यासाठी इंटरॅक्टिव्ह डिजिटल स्पेस म्युझियम उभारायला पाहिजे असं मत ही त्यांनी मांडलं. शेजारी देशांना आपण आपल्या उपग्रहांद्वारे मदत केली पाहिजे. ‘सार्क’ देशांना उपयोगी ठरेल असा एक ‘सार्क’ उपग्रह आपण प्रक्षेपित करावा, अशी माझी सूचना आहे, असंही मोदी म्हणाले. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या