हिसारमध्ये आपल्याच आश्रमात दडून बसलेल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू बाबा रामपाल याला वाचवण्यासाठी हजारो समर्थक सुरक्षा कडं करून आश्रमाबाहेर दबा धरून आहे. आतापर्यंत या धुमश्चक्रीत सहा जणांचा हाकनाक बळी गेलाय. पण या बाबाने अशी काय मोहिनी घातली, त्यामुळे बाबाला वाचवण्यासाठी जीव पणाला लावून समर्थक पोलिसांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. आजपर्यंत अनेक बाबांविरोधात समर्थकांचा राडा पाहण्यास मिळालाय. पण बाबा रामपाल हा त्यातला जर वेगळा निघालाय. बाबा रामपाल उच्चशिक्षित आहे. त्याने इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा केला आणि सिंचन विभागात कनिष्ठ अभियंता पदावर नोकरीही केलीये. त्यानंतर तो 1988 मध्ये कबीर पंथातल्या संत रामदेवानंद यांचा अनुयायी झाला. पाच वर्ष रामदेवानंद यांच्याकडून शिक्षा घेतल्यानंतर त्याने प्रवचनं द्यायला सुरूवात केली. प्रवचनं सुरू केल्यानंतर रामपालचा ‘बाबा रामपाल’ झाला. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी त्याने प्रवचनं केली. त्याच्या प्रवचनंची ख्याती परदेशातही पोहचली. सुटा-बुटातला हा बाबा सगळ्यांनाच वेगळा आणि आकर्षित ठरला. रामपाल हा कबीर पंथाचा कडवा पाठीराखा आहे. हिंदू देवी-देवतांची आणि मूर्तिपूजा करायला, देवळात जायला त्याने कडाडून विरोध करतो. एवढंच नाहीतर मी, कबीराचा अवतार आहे, असा साक्षात्कारच रामपालला झालाय. त्यामुळे कबीर हाच सर्वोच्च ईश्वर आहे असं म्हणत वेद, गीता, कुराण, बायबलचे दाखले देतो. ब्रह्मा-विष्णू-महेश ही त्रिमूर्ती थोतांड आहे आणि त्यांच्या भक्तीने मोक्ष मिळणार नाही, असा प्रचार त्याने केला. तसंच विवाहबाह्य संबंध आणि ‘अश्लिल’ नाचगाण्यांना त्याने विरोध केला.
काळ्या कारकिर्दीला सुरूवात 1999 मध्ये रोहतक जिल्ह्यात सतलोक आश्रमाची स्थापना केली नंतर राज्यभरात त्याने आश्रम उघडलं. 2000 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांच्याविरोधात वक्तव्य केल्यामुळे आर्य समाजींशी मोठा संघर्ष झाला. त्यानंतर बरंच पाणी पुलाखाली वाहून गेला. प्रवचनगिरी सुरू असताना त्याच्या कारकिर्दीला नंतर काळा डाग बसला. 2006 मध्ये रामपाल समर्थकांनी गावकर्यांवर केलेल्या गोळीबारात एक महिला ठार झाली. या प्रकरणी पोलिसांनी रामपालवर खुनाचा गुन्हा दाखल केला. हरियाणा सरकारनेही कडक कारवाई करत त्याचा आश्रम ताब्यात घेतला. एवढं घडूनही बाबा काही शांत बसला नाही. 2013 मध्ये पुन्हा स्थानिकांसोबत झालेल्या संघर्षात 3 जण ठार झाले. पोलिसी कारवाईच्या धाकाने बाबाने आपलं आश्रम हिसार जिल्ह्यात हलवला. या दोन्ही प्रकरणी कोर्टात खटला सुरू होता. पण वारंवार सूचना देऊनही 2010 पासून रामपाल सलग 42 वेळा सुनावणीला गैरहजर राहिला. बाबाकडे 4 हजार सशस्त्र सैन्याची फौज प्रवचनाच्या बळावर रामपालने आपलं वेगळं विश्व निर्माण केलं. आपल्या सुरक्षेसाठी त्याने राष्ट्रीय समाज सेवा समिती (RSSS) नावाचं स्वतःचं सैन्य तयार केलंय. त्याच्या या सैन्यात चार हजार प्रशिक्षित, सशस्त्र जवान आहे. प्रत्येक जवानाकडे अत्याधुनिक बंदुकाने सज्ज आहे. त्याच्या आश्रमाच्या ‘वॉर रूम’मधून जवानांचं नियंत्रण असतं. त्याचं हे सैन्य गुप्तहेर शाखा, पोलीस आणि विरोधकांवर नजर ठेऊन असते. सध्या ज्या हिसारच्या आश्रमाबाहेर संघर्ष पेटला आहे त्या आश्रमाभोवती उंट तटबंदी बांधण्यात आलीये. आश्रमात शस्त्रास्त्र आणि दगडांचा मोठा साठा साठवून ठेवण्यात आलाय. त्यामुळे पोलीस आणि समर्थकांमध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झालीये. कोण आहे रामपाल? - रामपाल हा हरियाणातला स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू - इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा, सिंचन विभागात कनिष्ठ अभियंता पदावर काम केलंय - 1988 : कबीर पंथातल्या संत रामदेवानंद यांचा अनुयायी झाला - 1993 : प्रवचनं द्यायला सुरुवात केली, रामपालचा ‘बाबा रामपाल’ झाला - 1999 : रोहतक जिल्ह्यात सतलोक आश्रमाची स्थापना केली, नंतर राज्यभरात आश्रम उघडले - 2000 : स्वामी दयानंद सरस्वती यांच्याविरोधात वक्तव्य केल्यामुळे आर्य समाजींशी मोठा संघर्ष - 2006 : रामपाल समर्थकांनी गावकर्यांवर केलेल्या गोळीबारात एक महिला ठार - रामपालवर खुनाचा गुन्हा दाखल, हरियाणा सरकारने आश्रम ताब्यात घेतला - 2013 : स्थानिकांसोबत झालेल्या संघर्षात 3 ठार, बाबाने आश्रम हिसार जिल्ह्यात हरवला - वारंवार सूचना देऊनही 2010 पासून रामपाल सलग 42 वेळा सुनावणीला गैरहजर आध्यात्मिक बाबाचं सशस्त्र सैन्य! - राष्ट्रीय समाज सेवा समिती (RSSS) नावाचं स्वतःचं सैन्य तयार केलंय - RSSS मध्ये 4000 प्रशिक्षित, सशस्त्र जवान - प्रत्येक जवानाकडे अत्याधुनिक बंदुका - वॉकी-टॉकीवरून संपर्क, आश्रमातल्या ‘वॉर रूम’मधून जवानांचं नियंत्रण - RSSS ची गुप्तहेर शाखा पोलीस आणि विरोधकांवर नजर ठेवते - हिसारच्या मुख्य आश्रमाभोवती उंच तटबंदी - आश्रमात शस्त्रास्त्र आणि दगडांचा मोठा साठा रामपाल बाबाची विचारसरणी - रामपाल कबीर पंथाचा कडवा पाठीराखा - हिंदू देवी-देवतांची आणि मूर्तिपूजा करायला विरोध, देवळात जायला विरोध करतो - मी कबीराचा अवतार आहे, असा दावा करतो - कबीर हाच सर्वोच्च ईश्वर आहे असं म्हणत वेद, गीता, कुराण, बायबलचे दाखले देतो - ब्रह्मा-विष्णू-महेश ही त्रिमूर्ती थोतांड आहे आणि त्यांच्या भक्तीने मोक्ष मिळणार नाही, असा प्रचार करतो - विवाहबाह्य संबंध आणि ‘अश्लिल’ नाचगाण्यांना विरोध करतो +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++