JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / जन्मदातेच ठरले मारेकरी , आज शिक्षेची सुनावणी

जन्मदातेच ठरले मारेकरी , आज शिक्षेची सुनावणी

26 नोव्हेंबर : गेली 5 वर्ष ज्या खळबळजनक खून खटल्याकडे पूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं त्या आरुषी-हेमराज खून खटल्याचा आज साडे पाच वर्षांनंतर निकाल लागलाय. या प्रकरणी आरुषीचे आई-वडीलच दोषी आढळले आहेत. हा निकाल गाझियाबादमधल्या विशेष सीबीआय कोर्टाने दिलाय. या दोघांना किती शिक्षा व्हावी याबाबतचा युक्तीवाद आज मंगळवारी 2 वाजता सुरू होणार आहे. निकालाची घोषणा होताच दोघांनाही कोर्टात रडू कोसळलं. आम्हाला या निकालानं जबर धक्का बसलाय आणि आम्ही अलाहबाद हायकोर्टात अपील करणार आहोत, अशी प्रतिक्रिया तलवार दाम्पत्याच्या वकील रिबेका जॉन यांनी दिली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

aarushi_144206  26 नोव्हेंबर : गेली 5 वर्ष ज्या खळबळजनक खून खटल्याकडे पूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं त्या आरुषी-हेमराज खून खटल्याचा आज साडे पाच वर्षांनंतर निकाल लागलाय. या प्रकरणी आरुषीचे आई-वडीलच दोषी आढळले आहेत. हा निकाल गाझियाबादमधल्या विशेष सीबीआय कोर्टाने दिलाय. या दोघांना किती शिक्षा व्हावी याबाबतचा युक्तीवाद आज मंगळवारी 2 वाजता सुरू होणार आहे. निकालाची घोषणा होताच दोघांनाही कोर्टात रडू कोसळलं. आम्हाला या निकालानं जबर धक्का बसलाय आणि आम्ही अलाहबाद हायकोर्टात अपील करणार आहोत, अशी प्रतिक्रिया तलवार दाम्पत्याच्या वकील रिबेका जॉन यांनी दिली.

15 मे 2008.. दिल्लीजवळच्या नोएडामधला सेक्टर 25..जलवायू विहारमधल्या तलवार यांच्या घरात या रात्री नेमकं काय घडलं. याबद्दल गेल्या साडे पाच वर्षांपासून देशभरात चर्चा सुरू होती. 14 वर्षांच्या आरुषीला आणि हेमराजला कुणी मारलं. या चर्चेवर अखेर कोर्टाने पडदा टाकलाय. आरुषीला तिच्या आई-वडिलांनीच म्हणजे डॉ.राजेश तलवार आणि डॉ.नुपूर तलवार यांनी कट करून मारल्याचं गाझियाबादच्या विशेष सीबीआय कोर्टात सिद्ध झालंय.

संबंधित बातम्या

न्यायाधीश म्हणतात… “पालक हे आपल्या मुलांचे सर्वोत्तम संरक्षक असतात. हा मानवी स्वभावाचा भाग आहे. पण मानव जातीच्या इतिहासात असेही विक्षिप्त लोक झाले आहेत, ज्यांनी स्वतःच्या पोटच्या पोराचा जीव घेतला आहे.” डॉ राजेश आणि नुपूर तलवार या गुन्ह्यांखाली दोषी

निकालाची घोषणा होताच राजेश आणि नुपूर तलवार या दोघांनाही कोर्टात रडू कोसळलं. ‘जो गुन्हा आम्ही केलाच नाही त्याबद्दल दोषी धरल्यामुळे आम्हाला तीव्र धक्का बसलाय. पण आम्ही हार मानणार नाही. न्यायासाठी आम्ही लढत राहू.’ असं ते म्हणाले. मंगळवारी या दोघांच्या शिक्षेबद्दल युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर नुपूर आणि राजेश हायकोर्टात अपील करणार आहेत.
घटनाक्रम

खटल्याचा घटनाक्रम आरूषी-हेमराज खून प्रकरणी 23 मे रोजी राजेश तलवार यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर दासना जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. सीबीआयला त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात अपयश आल्यामुळे 13 जुलै 2008 आरूषी-हेमराज केसमधील आरोपी डॉ. राजेश तलवार यांची दासना जेलमधून मुक्तता झाली. दोन वर्षांनंतर 2010 मध्ये सीबीआयने कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला. आरुषी आणि हेमराज यांचा खून नक्की कोणी केला हे त्यात त्यांना स्पष्ट करता आले नाही आणि इथून सुरुवात झाली एका गुंतागुंतीच्या केसची. कम्पाउंडर कृष्णा आणि त्याचे मित्र-राजकुमार आणि विजय मोंडल यांच्या विरोधातल्या वैज्ञानिक पुराव्यांकडे दुर्लक्ष केल्याचे सांगत सुरुवातीला क्लोजर रिपोर्टवरच आक्षेप घेण्यात आले. सोबत घटनास्थळावरून अधिक डीएनए सॅम्पल्स घेण्यात यावी अशाही सूचना देण्यात आली होती. 9 फेब्रुवारी 2011 ला कोर्टाने राजेश आणि नुपूर तलवार या दोघांच्या विरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले. स्वतःच्या मुलगी आरुषी आणि नोकर हेमराज या दोघांचा खून केल्याचा आरोप आता या नवरा बायकोवर होतं. या सगळ्यावर स्थगिती आणण्यासाठी तलवार दाम्पत्याने आधी हायकोर्टात याचिक दाखल केली. ती फेटाळली गेली, मग ते सुप्रीम कोर्टाकडे गेले, पण सुप्रीम कोर्टानेही त्यांना नाकारलं. मग बचाव पक्षाने या खटल्याची सुनावणी गाझियाबादच्या बाहेर नेण्याची मागणी केली पण ती ही फेटाळली गेली. तलवार दाम्पत्याच्या विरोधात वारंवार समन्स बजावण्यात आले पण ते कोर्टात हजर झाले नाहीत. अखेरीस गाझियाबाद कोर्टाने त्यांच्या विरोधात वॉरंट बजावले. राजेश तलवारांना जामीन मिळाला, पण नुपूर तलवारांच्या विरोधातील वॉरंट अजामीनपात्र होतं. कोणत्याही क्षणी त्यांना अटक होणार हे जाणवल्यावर त्या भूमिगत झाल्या आणि मग दिल्ली आणि आसपासच्या परिसरात सीबीआयने त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. अटक होऊ नये म्हणून त्यांच्या वकिलाने पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली. नुपूर तलवार यांना अटक न करण्याची सूचना कोर्टाने सीबीआयला दिली. पण अखेरी कोर्टाने नुपूर तलवार यांना ट्रायल कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश देले. 20 एप्रिल 2011 ला नुपूर तलवार यांना अटक झाली आणि त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. आधीची ऑर्डर आणि ट्रायल कोर्टातील कामकाजाचा आढावा घेण्यात यावा अशी आणखीन एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली. एका जळजळीत टीकेसह ती ही याचिका कोर्टाने फेटाळली. ‘‘मॅजिस्ट्रेटने दिलेल्या प्रत्येक ऑर्डरला या कोर्टात आव्हान देण्यात येतंय, असं पाहण्यात आले आहे. अशाप्रकारे आव्हान देणे हा कायद्यानुसार प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे,पण या हक्काचा गैरवापर होता कामा नाही.’’ आता तलवार दाम्पत्याकडे खटल्याला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नव्हता. फेब्रुवारी 2011 मध्ये अखेरीस खटल्याला सुरुवात झाली. तब्बल पाच वर्षानंतर या प्रकरणाचा अखेर निकाल लागला. गाझियाबाद कोर्टाने तलवार दाम्पत्याला दोषी ठरवलंय मात्र शिक्षेचा निर्णय राखून ठेवला असून उद्या यावर सुनावणी होणार आहे. या दुहेरी हत्याकांड प्रकरणी कोर्ट काय शिक्षा सुनावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.  

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या