JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 'आप' सोमनाथ भारतींच्या पाठीशी

'आप' सोमनाथ भारतींच्या पाठीशी

24 जानेवारी : युगांडाच्या महिलांशी गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेले दिल्लीचे कायदामंत्री सोमनाथ भारती यांच्या पाठीशी आम आदमी पक्ष ठामपणे उभा राहिलाय. भारती यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागलीये. मात्र, खिडकी एक्स्टेंशन परिसरात छापे टाकून भारती यांनी काही चूक केलेलं नाही. त्याचे 4 व्हिडिओ आहेत, आणि त्यापैकी एका व्हिडिओमध्ये भारती चूक असल्याचं दिसत नाही, असं आपचे सदस्य योगेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे भाजपनं भारती यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा दबाव वाढवण्यासाठी दिवसभर दिल्लीत 14 धरणं आंदोलन करण्याचं ठरवलंय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

aap bharti 24 जानेवारी : युगांडाच्या महिलांशी गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेले दिल्लीचे कायदामंत्री सोमनाथ भारती यांच्या पाठीशी आम आदमी पक्ष ठामपणे उभा राहिलाय. भारती यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागलीये. मात्र, खिडकी एक्स्टेंशन परिसरात छापे टाकून भारती यांनी काही चूक केलेलं नाही. त्याचे 4 व्हिडिओ आहेत, आणि त्यापैकी एका व्हिडिओमध्ये भारती चूक असल्याचं दिसत नाही, असं आपचे सदस्य योगेंद्र यादव यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे भाजपनं भारती यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा दबाव वाढवण्यासाठी दिवसभर दिल्लीत 14 धरणं आंदोलन करण्याचं ठरवलंय. दरम्यान, भारती यांना आज दुपारपर्यंत दिल्ली महिला आयोगाने बजावलेल्या समन्सला उत्तर द्यायचं आहे. या प्रकरणी तीन एफआयआरही दाखल करण्यात आले आहे. पण या एफआयआरमध्ये भारती यांचं नाव नाहीय.

सोमनाथ भारती यांनी पोलिसांना छापे टाकण्याचे आदेश दिले होते पण पोलिसांनी पुराव्याअभावी आदेश माणण्यात नकार दिला त्यामुळे या चारही पोलिसांना निलंबित करण्यात यावं या मागणीसाठी खुद्द आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल रस्त्यावर उतरले होते. आणि दोन दिवस धरणं आंदोलन केलं होतं. केजरीवाल यांच्या आंदोलनावर चौफेर टीका होत आहे. पण तरीही पक्षांनी सोमनाथ भारतींच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घेतलाय.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या