JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 'आदर्श' अहवाल दडपला

'आदर्श' अहवाल दडपला

**20 डिसेंबर :**बहुचर्चित आदर्श घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशीच्या अहवालात राज्याच्या चार माजी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढण्यात आलेत. पण, हा अहवाल राज्य सरकारनं फेटाळलाय. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार भ्रष्ट नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं आज दिसलं. ‘आदर्श’ घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशीचा अंतिम अहवाल राज्य सरकारनं आज अखेर विधिमंडळात मांडला. यात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर आणि राज्य मंत्रिमंडळातले राष्ट्रवादीचे मंत्री सुनिल तटकरे, राजेश टोपे यांच्यावर ताशेरे ओढण्यात आलेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

cm on aadarshq **20 डिसेंबर :**बहुचर्चित आदर्श घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशीच्या अहवालात राज्याच्या चार माजी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढण्यात आलेत. पण, हा अहवाल राज्य सरकारनं फेटाळलाय. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार भ्रष्ट नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं आज दिसलं.

 ‘आदर्श’ घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशीचा अंतिम अहवाल राज्य सरकारनं आज अखेर विधिमंडळात मांडला. यात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर आणि राज्य मंत्रिमंडळातले राष्ट्रवादीचे मंत्री सुनिल तटकरे, राजेश टोपे यांच्यावर ताशेरे ओढण्यात आलेत. तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पदाचा लाभ घेतल्याचा थेट ठपका ठेवण्यात आला आहे.

इतकंच नाही तर आदर्श सोसायटीत 22 बेनामी फ्लॅट्स असून 102 पैकी 38 सदस्य अपात्र असल्याचंही हा अहवाल सांगतो. हा अंतिम अहवाल भाग-2 नावाने प्रसिद्ध करण्यात आला होता. पण हा अंतिम अहवाल फेटाळल्याचे राज्य सरकारने कृती अहवालातून जाहीर केलं. अंतिम अहवालाच्या प्रती वाटण्यात आल्या होत्या. पण कृती अहवालाची प्रत मात्र प्रसिद्ध करण्यात आली नाही.

संबंधित बातम्या

गेल्या वर्षी न्यायालयीन अहवालाचा अंतरिम अहवाल जो भाग-1 होता तो मांडण्यात आला होता. त्यामध्ये सरकारच्या मालकीची जमीन आणि जमिनीवर कुठलंही आरक्षण नाही, या शिफारसी करण्यात आल्या होत्या. त्या दोन्ही शिफारसी सरकारनं स्वीकारल्या. पण आज मांडलेल्या अंतिम अहवालातील शिफारसी मात्र सरकारनं स्वीकारल्या नाहीत.

यावरून विरोधकांनी आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. भ्रष्ट नेत्यांना वाचवण्यासाठी सरकारनं हा अहवाल फेटाळला. अहवालाच्या शिफारसी स्वीकारल्या असत्या तर, मुख्यमंत्र्यांची खुर्ची डळमळीत झाली असती, त्यामुळेच सरकारनं हा निर्णय घेतल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलाय. हे प्रकरण आता आपण जनतेच्या न्यायालयात नेऊ, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, सरकारच्या या कृतीचा निषेध म्हणून विरोधकांनी विधानभवन परिसरात अहवालाच्या प्रति फाडल्या.

जाहिरात

 ‘आदर्श’ अहवालातील निष्कर्ष :

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या