31 ऑक्टोबर : शपथविधीच्या सरकारी कार्यक्रमाला साधू-संत, बुवा- बापू व्यासपीठावर का उपस्थित होते असा सवाल काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारला विचारलाय. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही अंधश्रद्धा असल्याचा टोला चव्हाण यांनी फडणवीस यांना लगावला.
‘मी मुख्यमंत्री असताना माझ्या खासगी कार्यक्रमासाठी बंगल्यावर सत्यसाईबाबा आले होते’, तेव्हा माझ्यावर अंधश्रद्धा पसरवत असल्याचा आरोप झाला होता’. त्यामुळे शपथविधीला उपस्थित असलेले धर्मगुरू ही अंधश्रद्धा नाही का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
विशेष म्हणजे या शपथविधीला काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते उपस्थित होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++