JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / अॅम्बी व्हॅली होणार बे'सहारा', जप्तीचे कोर्टाचे आदेश

अॅम्बी व्हॅली होणार बे'सहारा', जप्तीचे कोर्टाचे आदेश

06 फेब्रुवारी : सहारा उद्योगसमूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या ‘अॅम्बी व्हॅली’वर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. पुण्याजवळच्या लोणावळ्यामध्ये ही पंचतारांकित टाऊनशिप उभारण्यात आलीय. सुब्रतो रॉय यांनी गुंतवणूकदारांची 36 हजार कोटींची फसवणूक केल्याबद्दल त्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आलीय. सुब्रतो रॉय 2014 पासून तिहार तुरुंगात आहेत. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सुब्रतो रॉय यांना 28 फेब्रुवारी 2014 मध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली होती. सेबीने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या खटल्यामुळे त्यांच्यावर अटक वॉरंट निघालं होतं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

  sahara_ambi_valliy 06 फेब्रुवारी : सहारा उद्योगसमूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या ‘अॅम्बी व्हॅली’वर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. पुण्याजवळच्या लोणावळ्यामध्ये ही पंचतारांकित टाऊनशिप उभारण्यात आलीय. सुब्रतो रॉय यांनी गुंतवणूकदारांची 36 हजार कोटींची फसवणूक केल्याबद्दल त्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आलीय. सुब्रतो रॉय 2014 पासून तिहार तुरुंगात आहेत. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सुब्रतो रॉय यांना 28 फेब्रुवारी 2014 मध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली होती. सेबीने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या खटल्यामुळे त्यांच्यावर अटक वॉरंट निघालं होतं. त्यानंतर त्यांच्यावर खटला सुरू आहे. सहारा उद्योगसमूहाला गुंतवणूकदारांचे पैसे उभे करण्यासाठी मालमत्ता विक्रीची परवानगी देण्यात आली होती. सहाराने सेबीमध्ये 10 हजार कोटी रुपये जमा करावेत, असंही त्यांना कोर्टाने सांगितलं होतं. पण सुब्रतो रॉय एवढी रक्कम जमा करू शकलेले नाहीत. त्यासाठीच त्यांच्या मालमत्तांवर टाच आणली जातेय.  काय आहे अॅम्बी व्हॅली ? - पुणे जिल्ह्यातली पंचतारांकित टाऊनशिप - लोणावळ्यापासून 23 किमी अंतरावरची अत्याधुनिक वसाहत - अत्याधुनिक सोयीसुविधा आणि पर्यावरणाचा मेळ साधून ही वसाहत उभी केल्याचा ‘सहारा’चा दावा - लोणावळ्याजवळच्या डोंगराळ भागात 10 हजार 600 एकरमध्ये उभारलीय ही टाऊनशिप - अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यासारख्या 72 सेलिब्रेटिजना बंगल्यांचं वाटप - अॅम्बी व्हॅलीमध्ये रंगतात पंचतारांकित पार्ट्या आणि इव्हेंट्स - आदिवासींची जमीन लुबाडून ही वसाहत उभारल्याचा आरोप - अॅम्बी व्हॅलीनंतर पुणे जिल्ह्यात ‘लवासा’सारख्या टाऊनशिप्सची उभारणी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या