JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / जम्मू-काश्मीर सरकार पाडण्याच्या कटात व्ही.के.सिंग सहभागी?

जम्मू-काश्मीर सरकार पाडण्याच्या कटात व्ही.के.सिंग सहभागी?

20 सप्टेंबर : माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंग हे आता आणखी एका वादात सापडले आहेत. सिंग यांनी जम्मू-काश्मीर सरकार उलथवून टाकण्यासाठी आर्मीत एक स्पेशल युनिट स्थापन केलं होतं असा खळबळजनक दावा ‘इंडियन एक्स्प्रेस’ने केलाय. एक्स्प्रेसच्या बातमीनुसार लष्कराच्या बोर्ड ऑफ आफिसर्सच्या चौकशीत ही बाब समोर आलीयं. आणि या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी अशी शिफारस या चौकशी समितीने केल्याचा दावा या बातमीत करण्यात आलाय. या व्यतिरिक्त व्ही.के सिंग यांनी लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेचा एक भाग असलेल्या टेक्निकल सर्व्हिसेस डिव्हिजनच्या मार्फत सध्याचे लष्करप्रमुख बिक्रम सिंग यांच्या बढतीत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला असा दावाही या बातमीत करण्यात आलाय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Image img_196192_vksingh_240x180.jpg 20 सप्टेंबर : माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंग हे आता आणखी एका वादात सापडले आहेत. सिंग यांनी जम्मू-काश्मीर सरकार उलथवून टाकण्यासाठी आर्मीत एक स्पेशल युनिट स्थापन केलं होतं असा खळबळजनक दावा ‘इंडियन एक्स्प्रेस’ने केलाय. एक्स्प्रेसच्या बातमीनुसार लष्कराच्या बोर्ड ऑफ आफिसर्सच्या चौकशीत ही बाब समोर आलीयं. आणि या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी अशी शिफारस या चौकशी समितीने केल्याचा दावा या बातमीत करण्यात आलाय. या व्यतिरिक्त व्ही.के सिंग यांनी लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेचा एक भाग असलेल्या टेक्निकल सर्व्हिसेस डिव्हिजनच्या मार्फत सध्याचे लष्करप्रमुख बिक्रम सिंग यांच्या बढतीत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला असा दावाही या बातमीत करण्यात आलाय. बोर्ड ऑफ ऑफिसर्सच्या अहवालाची गंभीर दखल संरक्षण मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयानं घेतली असल्याचंही या बातमीत म्हटलंय. पण व्ही. के. सिंग यांनी आपण गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत एका कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळेच आपल्याला टार्गेट करत असल्याचं पीटीआयशी बोलताना म्हटलंय.  काय आहेत प्रमुख आरोप?

संरक्षण मंत्रालयाचं स्पष्टीकरण

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या