JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / अतिवृष्टीग्रस्तांवर जंगलात राहण्याची नामुष्की !

अतिवृष्टीग्रस्तांवर जंगलात राहण्याची नामुष्की !

आशिष जाधव,यवतमाळ 10 ऑगस्ट : अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीला यंदा तीनदा पूर आला. त्या पुरात काठावरच्या अनेक गावांमधील शेतीचं मोठं नुकसान झालं.पण तिथे सरकारी मदत मात्र अजूनही पोहचलेली नाही. यवतमाळ जिल्ह्यातल्या पैनगंगेच्या काठावरच्या 200 गावांना पुराचा फटका बसला. शेतात आणि घरात पाणी घुसलंय. पुराच्या भीतीनं घाटंजी तालुक्यातल्या भीमकुंड गावाचे रहिवाशी गाव सोडून जंगलात स्थलांतरीत झाले आहेत. पैनगंगाच्या पहिल्यापुरात शेती वाहून गेल्यानं विलासचा भाऊ अनिल ने आत्महत्या केलीय. पैनगंगेच्या पुरामुळे हजारो हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झालंय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

आशिष जाधव,यवतमाळ

10 ऑगस्ट : अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीला यंदा तीनदा पूर आला. त्या पुरात काठावरच्या अनेक गावांमधील शेतीचं मोठं नुकसान झालं.पण तिथे सरकारी मदत मात्र अजूनही पोहचलेली नाही. यवतमाळ जिल्ह्यातल्या पैनगंगेच्या काठावरच्या 200 गावांना पुराचा फटका बसला. शेतात आणि घरात पाणी घुसलंय. पुराच्या भीतीनं घाटंजी तालुक्यातल्या भीमकुंड गावाचे रहिवाशी गाव सोडून जंगलात स्थलांतरीत झाले आहेत.

पैनगंगाच्या पहिल्यापुरात शेती वाहून गेल्यानं विलासचा भाऊ अनिल ने आत्महत्या केलीय. पैनगंगेच्या पुरामुळे हजारो हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झालंय. कुठे शेती खरडून गेली तर कुठे वाहून गेली. बघावं तिकडे पाणी साचलंय. पैनगंगेच्या पट्टयात जिथे जावं तिथं शेतीचं नुकसान झालंय. पण सरकारी मदत कुठेही पोहचताना दिसत नाही.

संबंधित बातम्या

मोठा गवगवा करत सकारनं मदतीची घोषणा केली. पण पुरग्रस्त शेतकर्‍यांना तातडीची मदतही अजून मिळालेली नाही. त्यामुळे सरकार कायम स्वरुपी उपाययोजना करेल, यावर शेतकरायांचा विश्वास बसत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या