JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / अखेर शशी थरूर यांच्या चौकशीला सुरुवात

अखेर शशी थरूर यांच्या चौकशीला सुरुवात

19 जानेवारी : सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाला आज (सोमवारी) नाट्यमय वळण लागलंय. या प्रकरणात आज पहिल्यांदाच सुनंदाचे पती, काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं. आज रात्री 8 च्या सुमाराला दिल्लीतल्या वसंत विहार पोलीस स्टेशनमध्ये चौकशीला सुरुवात झालीये. 17 जानेवारी 2014 रोजी दिल्लीतल्या द लीला या हॉटेलमध्ये सुनंदा यांचा मृतदेह अढळला होता. सुनंदा यांनी आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. नंतर वर्षभरात सुनंदा पुष्कर केसचा तपास धीम्या गतीने झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

sunanda pushkar photo gallery (15) 19 जानेवारी : सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाला आज (सोमवारी) नाट्यमय वळण लागलंय. या प्रकरणात आज पहिल्यांदाच सुनंदाचे पती, काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं. आज रात्री 8 च्या सुमाराला दिल्लीतल्या वसंत विहार पोलीस स्टेशनमध्ये चौकशीला सुरुवात झालीये.

17 जानेवारी 2014 रोजी दिल्लीतल्या द लीला या हॉटेलमध्ये सुनंदा यांचा मृतदेह अढळला होता. सुनंदा यांनी आत्महत्या केली, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. नंतर वर्षभरात सुनंदा पुष्कर केसचा तपास धीम्या गतीने झाला.

या तपासावर अनेकांनी टीका केली. अखेरीस सुनंदा यांची हत्या झाली असल्याचा साक्षात्कार दिल्ली पोलिसांना वर्षभरानंतर झाला आणि आता तपासाला वेग आलाय. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय. आज सकाळीच दिल्ली पोलिसांनी थरूर यांची चौकशी केली जाणार असं स्पष्ट केलं होतं.मात्र थरूर दिल्ली बाहेर असल्यामुळे त्यांना बोलवण्यात आलंय. त्यांची चौकशी सुरू असून चौकशी अंती पोलिसांच्या हाती काय लागतं हे पाहण्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या

थरूर यांना SIT कोणते प्रश्न विचारू शकते ? - 17 जानेवारीला तुम्हाला सुनंदा यांच्या प्रकृतीविषयीचा फोन आला तेव्हा तुम्ही कुठे होता? - अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत तुम्ही किती वेळ होता? - सुनंदा यांच्या शरिरावर जखमा कशा झाल्या? - इतरांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या दोघांमध्ये भांडणं व्हायची. या भांडणाचं कारण काय? - त्यांना इंजेक्शन कुणी दिलं? - तुम्हाला कुणावर संशय आहे का? - तिचे कुणाशी वैयक्तिक किंवा व्यावसायिक वाद होते का? - सुनंदा यांना लूपस नावाचा आजार होता आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला होता, असं तुम्ही का सांगितलं? - तुमच्यामध्ये भांडणं असतानाही वैवाहिक जीवनात तुम्ही दोघं आनंदी होता, असं तुम्ही पोलिसांना का सांगितलं? ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या