21 एप्रिल : ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतील अडचणीत सापडलेल्या ‘अंगुरी भाभी’ अर्थात शिल्पा शिंदे साठी मनसे मदतीला धावून आलीये. मनसेनं शिल्पा शिंदेंला पाठिंबा दिला असून तिच्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला तर शो चालू देणार नाही असा इशारा मनसेच्या चित्ररपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिलाय.
ऍण्ड टीव्ही वाहिनीवरील ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतील ‘अंगुरी भाभी’च्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने ही मालिका अचानक सोडली होती. त्यानंतर तिचा आणि मालिकेच्या निर्मात्यांचा वाद विकोपाला गेला. यावर तोडगा काढण्यासाठी कलाकारांची संघटना असलेल्या सिंटा या संघटनेने तिला पुन्हा कामावर रूजू व्हायला सांगितलं होतं.
मात्र, तरीही मालिका सोडण्यावर ठाम राहिल्यामुळे शिल्पावर कायमस्वरूपी बंदी घालावी यासाठी संघटनेच्या वतीने पत्रक काढण्यात आलं. मात्र, एखाद्या व्यक्तीला काम करण्यापासून रोखण्याला महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने विरोध केलाय. कायदेशीर मार्गाने यावर तोडगा काढण्याऐवजी शिल्पा शिंदेंवर अन्याय केला जात असल्याचं कारण देत मनसेने पत्रक काढणार्या संघटनांच्या विरोधात दंड थोपटले आहे. तसंच अशा निर्मात्यांनी बंदी घातली तर शो चालू देणार नाही असा इशारा ही दिलाय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv