JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / हातेकरांनी घेतली राज्यपालांची भेट

हातेकरांनी घेतली राज्यपालांची भेट

11 जानेवारी : प्राध्यापक डॉ.नीरज हातेकर यांनी आज कुलगुरु राजन वेळूकरयांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात राज्यपाल के.शंकर नारायणन यांची भेट घेतली. यावेळी हातेकरांसोबत विद्यार्थ्यांनीही राज्यपालांची भेट घेतली. हातेकरांच्या पाठिंब्यासाठी विद्यार्थ्यांनी सह्यांची मोहीम राबवली होती. हातेकरांना विद्यापीठात परत आणा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या सह्या राज्यपालांकडे सादर केल्या. लोकभारतीचे अध्यक्ष आणि आमदार कपिल पाटील हेदेखील हातेकरांसोबत होते. दरम्यान, हातेकर यांना आता काँग्रेसनंही पाठिंबा दिला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. जनार्दन चांदूरकर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

neeraj hatekar 4 11 जानेवारी : प्राध्यापक डॉ.नीरज हातेकर यांनी आज कुलगुरु राजन वेळूकरयांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात राज्यपाल के.शंकर नारायणन यांची भेट घेतली. यावेळी हातेकरांसोबत विद्यार्थ्यांनीही राज्यपालांची भेट घेतली.

हातेकरांच्या पाठिंब्यासाठी विद्यार्थ्यांनी सह्यांची मोहीम राबवली होती. हातेकरांना विद्यापीठात परत आणा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या सह्या राज्यपालांकडे सादर केल्या. लोकभारतीचे अध्यक्ष आणि आमदार कपिल पाटील हेदेखील हातेकरांसोबत होते.

दरम्यान, हातेकर यांना आता काँग्रेसनंही पाठिंबा दिला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. जनार्दन चांदूरकर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या