JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / सुब्रतो रॉय यांची तिहार जेलमध्ये रवानगी

सुब्रतो रॉय यांची तिहार जेलमध्ये रवानगी

04 मार्च : कोर्टात गैरहजर राहून अवमान केल्याबद्दल सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी सुप्रीम कोर्टाची बिनशर्त माफी मागितली. पण सुप्रीम कोर्टाने सुब्रतो रॉय यांना फटकारलं असून रॉय यांनी पोलीस कोठडीत रवानगी केलीय. या प्रकरणाची पुढची सुनावणी 11 मार्चला होणार आहे तोपर्यंत रॉय यांना दिल्ली पोलिसांच्या कोठडीत राहावे लागणार आहे. सुब्रतो रॉय आणि सहाराच्या दोन संचालकांना तिहार जेलमध्ये पाठवण्यात आलंय. गुंतवणूकदारांचे 20 हजार कोटी थकवल्याप्रकरणी सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना वारंवार कोर्टाने हजर राहण्यात बाबत नोटीस बजावली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

subroto roy 04 मार्च :  कोर्टात गैरहजर राहून अवमान केल्याबद्दल सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी सुप्रीम कोर्टाची बिनशर्त माफी मागितली. पण सुप्रीम कोर्टाने सुब्रतो रॉय यांना फटकारलं असून रॉय यांनी पोलीस कोठडीत रवानगी केलीय. या प्रकरणाची पुढची सुनावणी 11 मार्चला होणार आहे तोपर्यंत रॉय यांना दिल्ली पोलिसांच्या कोठडीत राहावे लागणार आहे. सुब्रतो रॉय आणि सहाराच्या दोन संचालकांना तिहार जेलमध्ये पाठवण्यात आलंय.

गुंतवणूकदारांचे 20 हजार कोटी थकवल्याप्रकरणी सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना वारंवार कोर्टाने हजर राहण्यात बाबत नोटीस बजावली. पण रॉय यांनी कोर्टाच्या नोटीसीला केराची टोपली दाखवली. अखेर कोर्टाने 28 फेब्रुवारीला सुब्रतो रॉय यांच्याविरोधात कोर्टाने अजामिनपात्र अटकवॉरंट जारी केलं. पाच दिवसांच्या तुरुंगवारी नंतर आज (मंगळवारी) कोर्टात सुनावणी झाली.

सुब्रतो रॉय यांनी हात जोडून कोर्टाची बिनशर्त माफी मागितली असून माझ्या 12 लाख कर्मचार्‍यांचा विचार करा अशी विनवणी कोर्टात केली तसंच दोन महिन्यात देणेकरांचे पैसे परत करू अशी ग्वाहीही रॉय यांनी दिली. पण कोर्टाने सुब्रतो रॉय यांचा विनंतीचा विचार करू पण सुब्रतो रॉय यांनी कोर्टाचा मान राखला नाही, अशा शब्दांत कोर्टाने आपली नाराजी व्यक्त केली. आपल्या मालमत्ता विकून गुंतवणूकदारांचे 20 हजार कोटी परत करू, असा प्रस्ताव सुब्रतो रॉय यांनी कोर्टाकडे दिला. पण कोर्टाने हा प्रस्ताव नाकारला.

संबंधित बातम्या

पैसे परत करण्याबाबत नवा प्रस्ताव सादर करेपर्यंत सुब्रतो रॉय आणि सहारा समूहाचे दोन संचालक पोलीस कोठडीतच राहणार आहेत. या प्रकरणाची पुढची सुनावणी 11 मार्चला होणार आहे. दरम्यान, सुब्रतो रॉय यांच्यावर आज सुप्रीम कोर्टाच्या आवारात एका व्यक्तीने शाई फेकली. रॉय यांच्याविरूद्ध घोषणा देत या व्यक्तीनं शाई फेकली. रॉय हे कोर्टात हजर राहण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला. मनोज शर्मा असं या व्यक्तीचं नाव आहे. आपण वकील आहोत असा दावा त्यानं केलाय. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या