22 एप्रिल : मी राज ठाकरेंना फोन केला होता आणि त्यानी मला समर्थन दिले होते ही गोष्ट खरी आहे. मला सर्वाधिक मतांनी निवडून यायचं आहे यासाठी आपण त्यांना पाठिंबा मागितला अशी स्पष्ट कबुली भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिली.
तसंच राद नरेंद्र मोदींच्या नावाने प्रचार करत आहे. पण मनसेसोबत आमची युती होणार नाही. आम्ही दोघेही एकत्र येऊ शकत नाही. जेव्हा 48 जागांचं वाटप करण्यात आलं होतं. तेव्हा राज यांना विचारलं होतं महायुतीत येणार का ? तर त्यांनी नाही म्हटलं होतं असा खुलासाही मुंडेंनी केला. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
15 एप्रिल रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडेंना बीडमध्ये पाठिंबा जाहीर केला. गोपीनाथ मुंडे यांनी फोन करून आपल्या पाठिंबा मागितला. त्यामुळे फक्त बीडमध्येच मुंडेंना पाठिंबा दिला असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. विशेष म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी आम्ही पाठिंबा मागितला नाही तर तुम्ही पाठिंबा देताच कशाला ? जर पाठिंबा द्यायचा असेल तर भाजपमध्ये सामिल व्हा असा सल्ला राजनाथ यांनी दिला होता.
पण आमचा पाठिंबा मोदींनी आहे भाजपला नाही असं प्रत्युत्तर राज यांनी दिलं होतं. एकीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मनसेच्या पाठिंब्याची गरज नाही असं सांगताय तर दुसरीकडे मुंडे यांनीच आता सर्वाधिक मतांनी निवडून येण्यासाठी मनसेची गरज असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता यावर शिवसेना काय भूमिका घेते हे महत्वाचे ठरणार आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++