JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / सरकार कुणाच्या सल्ल्यानं चालतं हे कालच कळलं, रावतेंचा टोमणा

सरकार कुणाच्या सल्ल्यानं चालतं हे कालच कळलं, रावतेंचा टोमणा

15 फेब्रुवारी : केंद्रातलं भाजप सरकार हे नेमकं कोणाच्या सल्ल्याने चालतं हे आम्हाला कालच कळलं, असा टोमणा शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी भाजपला मारलाय. ते पुण्यात बोलत होते. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीच्या दौर्‍यावर होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली होती. शरद पवार यांच्या राजकारणातला अनभूव मोठा आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. पवारांशी आपलं महिन्यातून किमान दोन तीनदा फोनवरून बोलणं होत असतं असा खुलासा मोदींनी आपल्या भाषणात केला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

ravate on pawar33 15 फेब्रुवारी : केंद्रातलं भाजप सरकार हे नेमकं कोणाच्या सल्ल्याने चालतं हे आम्हाला कालच कळलं, असा टोमणा शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी भाजपला मारलाय. ते पुण्यात बोलत होते.

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीच्या दौर्‍यावर होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली होती. शरद पवार यांच्या राजकारणातला अनभूव मोठा आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. पवारांशी आपलं महिन्यातून किमान दोन तीनदा फोनवरून बोलणं होत असतं असा खुलासा मोदींनी आपल्या भाषणात केला होता. अगोदरच शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. त्यावर रावतेंनी भाजपला चांगलाच टोमणा मारला. केंद्रातलं भाजप सरकार हे नेमकं कोणाच्या सल्ल्याने चालतं हे आम्हाला कालच कळलं, याबद्दल आमचे पक्षप्रमुखच निर्ण घेतील असं सांगण्यासही रावते विसरले नाही. रावतेंच्या या बोचर्‍या विधानामुळे युती सरकारमध्ये अजूनही धुसफूस सुरू असल्याचंच स्पष्ट होतंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

संबंधित बातम्या

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या