09 एप्रिल : देशातील सर्वात मोठा कॉर्पोरेट घोटाळा ठरलेल्या ‘सत्यम कॉम्प्युटर्स’प्रकरणी हैदराबादमधील विशेष कोर्टाने आज (गुरुवारी) बी. रामलिंग राजू याच्यासह सर्व 10 आरोपींना दोषी ठरवत कोर्टाने त्यांना 7 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. त्याचबरोबर रामलिंग राजू आणि त्याचा भाऊ रामा राजू यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.
सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने गेल्यावर्षी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून त्यांचा निकाल जाहीर केला होता. आपल्या 65 पानी आदेशात सेबीने ‘सत्यम कॉम्प्युटर्स’चा संस्थापक रामलिंग राजू याच्यासह 5 जणांना दोषी ठरवले. या प्रकरणी रामलिंगम राजूचा भाऊ रामा राजूला ही दोषी ठरवण्यात आलं आहे. हा खटला तब्बल 6 वर्षं सुरू होता. या खटल्यात आतापर्यंत 200हून अधिक साक्षीदारांची साक्ष झालीय तर 3 हजारांहून अधिक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. कॉर्पोरेटमधील या सर्वात मोठ्या घोटाळ्याचा उलगडा 2009मध्ये झाला होता. या घोटाळ्यात समभागधारकांचे जवळपास 14 हजार कोटींचं नुकसान झालेलं आहे.
काय आहे ‘सत्यम’ घोटाळा?
सत्यम’ घोटाळा घटनाक्रम
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++