13 सप्टेंबर : आयपीएल-स्पॉट फिक्सिंगप्रकरणी आज शुक्रवारी बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीची बैठक होतेय. फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या क्रिकेटपटूंच्या भवितव्याचा फैसला या बैठकीत होण्याची शक्यता आहे. राजस्थान रॉयल्सचे खेळाडू एस श्रीसंत, अजित चंडिला, अंकित चव्हाण हे दोषी आढळले होते. दरम्यान, फिक्सिंगप्रकरणी नेमण्यात आलेल्या सवानी समितीचा चौकशी अहवाल या बैठकीत ठेवण्यात येणार आहे. पण याआधीच हा अहवाल फुटला आहे. या अहवालानुसार अजित चंडिलावर आजन्म तर श्रीसंत आणि अंकित चव्हाणवर 10 ते 15 वर्ष बंदी येण्याची शक्यता आहे. अजित चंडिलाची फिक्सिंग 5 मे रोजी जयपूरमध्ये पुणे वॉरिअर्सविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये अजित चंडिलानं पहिल्यांदा स्पॉट फिक्सिंग केल्याचा खुलासा दिल्ली पोलिसांनी केला. चांदिलियाच्या स्पेलमध्ये दुसर्या ओव्हरमध्ये अजित 20 रन्स देणार हे ठरलं होतं आणि त्यासाठी किंमत 20 लाख पक्की झाली होती. पण या मॅचमध्ये अजित चांदिलियानं ठरलेली खूण ओव्हरअगोदर बूकीजना दिली नाही त्यामुळे या मॅचचे पैसे अजित चांदिलियाकडून बूकीजनं परत मागितले होते. - 5 मे 2013, जयपूर - राजस्थान रॉयल्स विरुद्ध पुणे वॉरियर्स - दुसर्या ओव्हरला 14 पेक्षा जास्त रन्स देण्यासाठी 20 लाख रुपये - बूकीजना खूण दिली नाही, त्यामुळे बूकीजनं पैसे मागितले परत श्रीसंतची फिक्सिंग 9 मे रोजी मोहालीमध्ये पंजाब किंग्ज इलेव्हन विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये श्रीसंतनं स्पॉट फिक्सिंग केल्याचा खुलासा पोलिसांनी केला. श्रीसंतनं त्याच्या स्पेलच्या दुसर्या ओव्हरमध्ये 14 पेक्षा जास्त रन्स देण्याचं मान्य केलं होतं. त्यासाठी त्यानं आपण टॉवेल आपल्या पँटला लावू ही खूण ठरवली होती. - 9 मे 2013, मोहाली - राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब - पँटमध्ये टॉवेल लावण्याची ठरली होती खूण अंकित चव्हाणची फिक्सिंग तर 15 मे रोजी मुंबईमध्ये मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये अंकित चव्हाणने स्पॉट फिक्सिंग केल्याचा खुलासा पोलिसांनी केला. अंकितनं त्याच्या स्पेलच्या दुसर्या ओव्हरमध्ये 14 पेक्षा जास्त रन्स देण्याचं कबूल केलं होतं. आणि त्यासाठी त्याला 60 लाख रुपये दिले गेले. पण हे डील अंकित चव्हाणनं केलं नव्हतं तर अजित चांदिलियानं अंकित चव्हाणला भुरळ घालत स्पॉट फिक्सिंग करायला भाग पाडलं होतं. - 15 मे 2013, मुंबई - राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स - दुसर्या ओव्हरला 14 पेक्षा जास्त रन्स देण्यासाठी 60 लाख रुपये - अजित चंडिलानं अंकित चव्हाणला स्पॉट फिक्सिंगसाठी केलं तयार अंकित चव्हाणचं करिअर - वय: 27 वर्ष - IPLमध्ये ‘राजस्थान रॉयल्स’ टीमचं प्रतिनिधित्व - याआधी ‘मुंबई इंडियन्स’ टीमचंही प्रतिनिधित्व केलंय. - ऑलराईंडर, डावखुरा बॅट्समन - फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ‘मुंबई टीम’चं प्रतिनिधित्व अजित चंडिलाचं करिअर - वय: 29 वर्ष - IPLमध्ये ‘राजस्थान रॉयल्स’ टीमचं प्रतिनिधित्व - ऑलराऊंडर, ऑफ ब्रेक बॉलर - याआधी ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’ टीमचंही केलं प्रतिनिधित्व - फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये हरयाणा टीमचं प्रतिनिधित्व - 2012: IPLमध्ये ‘पुणे वॉरियर्स’विरूध्द घेतली होती हॅट्ट्रिक