JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / श्रीनिवासन खुर्ची सोडा, सुनील गावस्करांना अध्यक्ष करा : कोर्ट

श्रीनिवासन खुर्ची सोडा, सुनील गावस्करांना अध्यक्ष करा : कोर्ट

27 मार्च : अनेक आरोपांनंतरही बीसीसीआयच्या खुर्चीला चिटकून बसलेल्या एन. श्रीनिवासन यांना अखेर सुप्रीम कोर्टाने खाली उतरवले. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला मोठा दणका दिलाय. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी निकाल देताना सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयवर कडक ताशेरे ओढले आहे. इतकंच नाही तर सुप्रीम कोर्ट उद्या शुक्रवारी सकाळी एक इंटेरीम ऑर्डर काढणार आहे. त्यानुसार चौकशी सुरू होईपर्यंत श्रीनिवासन यांना पायउतार व्हावं लागणार आहे. तोपर्यंत सुनील गावस्कर हे बोर्डाचे अंतरीम अध्यक्ष असतील.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

Image n_shrinivasan_300x255.jpg 27 मार्च : अनेक आरोपांनंतरही बीसीसीआयच्या खुर्चीला चिटकून बसलेल्या एन. श्रीनिवासन यांना अखेर सुप्रीम कोर्टाने खाली उतरवले. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयला मोठा दणका दिलाय.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी निकाल देताना सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयवर कडक ताशेरे ओढले आहे. इतकंच नाही तर सुप्रीम कोर्ट उद्या शुक्रवारी सकाळी एक इंटेरीम ऑर्डर काढणार आहे. त्यानुसार चौकशी सुरू होईपर्यंत श्रीनिवासन यांना पायउतार व्हावं लागणार आहे. तोपर्यंत सुनील गावस्कर हे बोर्डाचे अंतरीम अध्यक्ष असतील.

तर आयपीएलच्या सातव्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांना सहभागी होता येणार नाही. तर कोर्टाच्या या दणक्यानंतर श्रीनिवासन यांनी पायउतार होण्याची तयारी दाखवली आहे. या इंटेरीम ऑर्डवर उत्तर द्यायला बीसीसीआयला कोर्टाने एकाच दिवसाचा वेळ दिलाय. त्यामुळे आता बोर्ड बैठक कधी घेणार आणि उत्तर कधी तयार करणार हे बघावं लागणार आहे.

संबंधित बातम्या

महेंद्रसिंह धोनीही अडचणीत

दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीही अडचणीत आलाय. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी धोनीने मुदगल समितीकडे खोटी माहिती दिली, असा आरोप वकील हरीश साळवे यांनी कोर्टात केलाय. मात्र, यामध्ये एकट्या श्रीनिवासन यांची चूक नाही, गेल्या 7 वर्षांमध्ये बीसीसीआयच्या सर्व बड्या पदाधिकार्‍यांनी त्यांना पाठिंबा दिलाय, असं क्रिकेट समीक्षक मकरंद वायंगणकर यांनी परखडपणे स्पष्ट केलंय.

जाहिरात

कोर्टाचे ताशेरे - IPL फिक्सिंग प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हायची असेल तर श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावं - आम्हाला कोणाचंही चारित्रहनन करायचं नाही. पण जोपर्यंत श्रीनिवासन पदावरून पायउतार होत नाहीत तोपर्यंत पारदर्शकपणे चौकशी करता येणार नाही - श्रीनिवासन अजूनही अध्यक्षपदावर का बसलेत, हे समजत नाही - जर श्रीनिवासन अध्यक्षपदावरून पायउतार झाले नाहीत तर कोर्टाला त्यांच्याविरोधात आदेश काढावा लागेल

जाहिरात

आयबीएन लोकमतचे सवाल - एन श्रीनिवासन यांची कारकीर्द संपुष्टात आली आहे का? - बीसीसीआयचे पदाधिकारी श्रीनिवासन यांच्यावर कारवाई करतील का? - श्रीनिवासन यांच्याऐवजी सुनील गावसकर बीसीसीआय अध्यक्ष म्हणून योग्य उमेदवार आहेत का? - चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएलमध्ये खेळ खल्लास झाला आहे का?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या