JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 'शेवट गोड', मोदी-शरीफ यांच्यात हस्तांदोलन

'शेवट गोड', मोदी-शरीफ यांच्यात हस्तांदोलन

27 नोव्हेंबर : सार्क शिखर परिषदेमध्ये पहिल्यादिवशी एकमेकांकडे दुर्लक्ष केल्यानंतर आणि एकमेकांवर टीका केल्यानंतर आज परिषदेच्या समारोपावेळी शेवट गोड झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ दोघांनी हस्तांदोलन करत एकमेकांची विचारपूस केली. भारत आणि पाकिस्तानाचे संबंध अलीकडेच कमालीचे ताणले गेलेत. फुटीरत्वाद्यांशी चर्चा, सीमारेषेवर पाकची आगळीक, 26/11 हल्याचं दुख याचे पडसाद सार्क शिखर परिषदेत उमटले होते. 26/11 चा हल्ला आम्ही विसरू शकत नाही अशा शब्दात मोदींनी पाकला सुनावले होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

modi_sharif 27 नोव्हेंबर : सार्क शिखर परिषदेमध्ये पहिल्यादिवशी एकमेकांकडे दुर्लक्ष केल्यानंतर आणि एकमेकांवर टीका केल्यानंतर आज परिषदेच्या समारोपावेळी शेवट गोड झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ दोघांनी हस्तांदोलन करत एकमेकांची विचारपूस केली. भारत आणि पाकिस्तानाचे संबंध अलीकडेच कमालीचे ताणले गेलेत. फुटीरत्वाद्यांशी चर्चा, सीमारेषेवर पाकची आगळीक, 26/11 हल्याचं दुख याचे पडसाद सार्क शिखर परिषदेत उमटले होते. 26/11 चा हल्ला आम्ही विसरू शकत नाही अशा शब्दात मोदींनी पाकला सुनावले होते. एवढंच नाहीतर मोदींनी पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याकडे दुर्लक्ष करत हातमिळवणी केली नाही. आज परिषदेचा समारोप झाला यावेळी दोन्ही नेते एकत्र आले आणि हस्तांदोलन केलं. काही काळ एकमेकांची विचारपूसही केली. यापूर्वी रिट्रीट या कार्यक्रमात दोन्ही नेते समोरासमोर आले होते. दोघांनी हस्तांदोलन केलं असलं तरी यामुळे दोन्ही देशांमधली बोलणी सुरू होण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. दरम्यान, सार्क परिषदेत ऊर्जा निर्मिती करारावर स्वाक्षर्‍या झाल्यायत. पाकिस्तानमुळे या करारात अडथळे येत होते. तर सार्क राष्ट्रांमधल्या दळणवळण करारासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलीय. नवाझ शरीफ वगळता इतर सर्व सार्क देशांच्या प्रमुखांसोबत पंतप्रधान मोदींनी चर्चा केली. पण पाकिस्तानने मात्र भारताने मांडलेल्या 3 महत्त्वाच्या करारांमध्ये अडथळा आणला. चीनचाही समावेश सार्कमध्ये करावा अशी मागणी पाकिस्तानने केली. या मागणीला भारताने तत्परतेने विरोध केलाय. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]>

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

संबंधित बातम्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या