07 जानेवारी : चंद्रपूर जवळच्या बोर्डा गावातल्या एका शेतात असलेल्या कुंपणात आज दोन ते अडीच वर्षाची एक वाघीण अडकली होती. शेताजवळच्या जंगलात असलेल्या शेतातून वन्य प्राणी येत असल्यानं शेताला कुंपण केलं जातं. याच कुंपणात ही वाघीण अडकली.
वन्य विभागाच्या पथकानं बेशुद्ध करून या पट्टेदार वाघिणीला बाहेर काढलं. तिला चंद्रपूरच्या रामबाग नर्सरीत आणण्यात आलंय. कुंपणात अडकल्यानं तिच्या पायाला जखम झालीये. या वाघिणीवर उपचार सुरू असून नंतर तिला जंगलात सोडणार असल्याचं ताडोबा प्रकल्प संचालक जी. पी. गरड यांनी सांगितलंय. ++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++